प्रा.नरेंद्र भोसले यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव पदी निवड
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शिफारशीनुसार, प्रदेशाध्यक्ष पंडीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव पदी प्रा. नरेंद्र भोसले यांची निवड झाली. दलित चळवळीतील नेतुत्व म्हणून त्यांची ओळख आहे, उत्कृष्ट वक्ते, राजकीय विश्लेषक म्हणून ओळख त्यांची आहे.
नरेंद्र भोसले हे राज्यशास्त्र विभागातुन ते एम.ए.बी.एड. झाले आहेत. तसेच एम.ए.(इतिहास) मध्ये त्यांनी पदवी संपादन केली आहे. सामाजिक, राजकीय आंदोलनात त्यानी महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचें निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे.
निवडी नंतर बोलताना नरेंद्र भोसले म्हणाले, येणारा काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार घरोघरी पोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचं विकासाची नियोजित संकल्पना आणि त्यांनी जे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम केले ते वंचित समाजा पर्यंत पोहचवणे यासाठी प्रयत्न करणे असे मत मांडले.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मार्गदर्शक जयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष बळीरामकाका साठे, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, आमदार अभिजीत पाटील, आमदार उत्तमराव जानकर, आमदार नारायण पाटील, आमदार राजु खरे, अर्जुनसिंह मोहिते पाटील, शिवतेंजसिंह मोहिते पाटील, प्रकाशराव पाटील, मदन पाटील, प्रतापराव पाटील, अरूण तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे काम करून पक्षाची विचारधारा सर्वसामान्य जनते पर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, उपेक्षित समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करेन, असे मत त्यांनी व्यक्त केले, यावेळी अरूण तोडकर, सागर यादव शिवाजी ठोकळे आदी उपस्थित होते.