सहकार महर्षि कारखान्याच्या 1 लाख 1 हजार 111 व्या साखर पोत्याचे जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेल्या 1 लाख 1 हजार 111 व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटीलसाहेब यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
कारखान्याचा सिझन 2024-2025 चा ऊस गळीत हंगाम दिनांक 15/11/2024 रोजी सुरु झाला असून दि.28/11/2024 अखेर 1 लाख 24 हजार 860 मे.टन ऊसाचे गाळप होऊन 1 लाख 06 हजार क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले असून सरासरी साखर उतारा 9.35 % व आजचा साखर उतारा 9.40 % आहे. सध्या प्रति दिवस 8,500 मे.टन याप्रमाणे ऊसाचे गाळप होत आहे.
चालू सिझन 2024-2025 मध्ये को-जन वीज निर्मिती प्रकल्प दिनांक 07/11/2024 रोजी सुरु झाला असून दि.28/11/2024 अखेर 1 कोटी 09 लाख 45 हजार 090 युनीट वीज निर्माण झाली असून त्यामधुन 66 लाख 46 हजार 214 युनिट वीज विक्री केलेली आहे. तसेच उपपदार्थ प्रकल्प डिस्टीलरीमध्ये दि.28/11/2024 अखेर 18 लाख 94 हजार 219 लिटर्स रेक्टीफाईड स्पिरीट तसेच 16 लाख 78 हजार 454 लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले असलेची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.
साखर पोती पूजनाचे कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, महादेव क्षिरसागर, गोविंद पवार, सुभाष कटके, जयदिप एकतपुरे, रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक, प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत-पाटील, संचालिका सुजाता शिंदे, कार्यलक्षी संचालक-रणजित रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक-पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, राजेंद्र भोसले, धनंजय सावंत, सौ.हर्षाली निंबाळकर तसेच कार्यकारी संचालक-राजेंद्र चौगुले व खातेप्रमुख, कामगार युनियन प्रतिनिधी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.