मराठा सेवा संघ, मार्स हॉस्पिटल व ग्रामपंचायत वाघोली च्या वतीने माढा विधानसभेचे आ. अभिजीत पाटील यांचा सन्मान
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : माढा विधानसभा मतदारसंघातून अभिजीत आबा पाटील भरघोस मताने निवडून आल्याबद्दल मराठा सेवा संघ, मार्स हॉस्पिटल व ग्रामपंचायत वाघोली यांच्या वतीने टेंभुर्णी येथील मार्स हॉस्पिटलमध्ये त्यांचा शिवधर्म दिनदर्शिका, जिजाऊ प्रतिमा, शाल, पुस्तके व बुके देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मार्स हॉस्पिटलचे डॉ.राहुल पाटील डॉ.लालासाहेब शेंडगे डॉ.अमोल माने, डॉ.मदन कांबळे व स्टाफ उपस्थित होता.
मराठा सेवा संघाच्या वतीने इंजि.उत्तमराव माने, इंजि. अशोकराव रणनवरे, चेअरमन रवींद्र पवार, महादेव चव्हाण, अजित माने, उमेश माने, बाळासाहेब पवार, शिवाजीराव लोंढे, रहीम मुलाणी, दिलीप सांगडे, वल्लभ सांगडे बाळासाहेब पराडे यांनी आ. अभिजीत पाटील यांचा सन्मान केला.
वाघोली ग्रामपंचायतच्या वतीने गटनेते योगेश माने, उपसरपंच पंडित मिसाळ, अमोल मिसाळ, अशोक चव्हाण, संतोष पवार, बाळासाहेब मिसाळ, तुषार पाटोळे, विवेक चव्हाण यांनी आ.अभिजीत पाटील यांचा सन्मान केला.
सत्काराला उत्तर देताना नूतन आ.अभिजीत पाटील म्हणाले, माझी स्वतःची कारकीर्द मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड या संघटनेत सुरू झाली असून मराठा सेवा संघाच्या 32 कक्षासाठी आपले सहकार्य राहील तसेच मार्स हॉस्पिटलसाठीही सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. माळशिरस तालुक्यातील वाघोली गावाने आमदार अभिजीत पाटील यांना भरघोस लीड दिले आहे याचा देखील त्यांनी आवर्जून उल्लेख केला व वाघोली ग्रामपंचायतीला पुढच्या काळात विकास कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
प्रास्ताविकात डॉ.अमोल माने यांनी सर्वांचे स्वागत करून आमदार अभिजीत पाटील यांना शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून टेंभुर्णीचे युवक नेते रावसाहेब देशमुख, हॉस्पिटल जागेचे मालक प्रकाश पाटील, कवठळीचे युवक नेते विठ्ठल पाटील उपस्थित होते.