शहर
संदीप अवघडे यांचे गळफास घेऊन आत्महत्या
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : येथील अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे सचिव संदीप दाजीराम अवघडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात शकला पसरली आहे.
याबाबत दहिवडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी संदीप अवघडे मौजे पिंगळी खुर्द तालुका मान गावच्या हद्दीतील शिवचे नाव शिवारातील करंजाच्या झाडाला नायलॉन रशीच्या सहाय्याने गळफास घेऊन मयत झाले आहेत याबाबत त्यांचा मुलगा सागर अवघडे यांनी दिलेल्या वर्दीनुसार दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. अधिक तपास ए.एस.आय पी.ए. खाडे करत आहेत.
संदीप अवघडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.