शहर

नगरसेविका तृप्ती घाडगे यांच्या पुढाकाराने लोणंद मध्ये रंगणार भव्य गरबा व रास दांडिया

महर्षि डिजीटल न्यूज / किरण खरात

लोणंद : लोणंद नगरपंचायत नगरसेविका सौ तृप्ती राहुल घाडगे यांच्या पुढाकारातून लोणंद येथे कृषीराज लॉन्स लोणंद या ठिकाणी भव्य गरबा व रास दांडिया कार्यक्रम फक्त मुली व महिलांसाठी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नगरसेविका तृप्ती घाडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पुनम शहा, वैजयंती भोसले, प्रीतम गायकवाड, सुषमा निंबाळकर, वर्षा क्षीरसागर, तृप्ती हिंगमिरे, माधुरी हिंगळे, विमल घाडगे, श्रीमती प्रज्ञा दोशी, वृषाली शहा, अर्चना निकम, प्रतीक्षा कणसे, नीता देवकर, अर्चना सोनावळे, योगिता घोडके व युवा नेते राहुल घाडगे उपस्थित होते.

कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना तृप्ती घाडगे म्हणाल्या, गरबा व रास दांडिया खेळासाठी लागणारे साहित्य हे स्वतः घेऊन येणे गरजेचे आहे तसेच गरबा व दांडिया हा कार्यक्रम आठ दिवस चालणार असून त्या कार्यक्रमांमध्ये ट्रॉफी, गिफ्ट, पैठणी सर्टिफिकेट असे प्रत्येक वेगवेगळे पारितोषिक ठेवण्यात आलेली आहेत. या कार्यक्रमाचा लाभ अधिकाधिक महिलांनी घ्यावा असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!