Latest News

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फॉर्म स्वीकारण्यास अकलूज नगरपरिषदेत प्रारंभ ; 21 सप्टेंबर रोजी शिबिराचे आयोजन 

महर्षि डिजीटल न्यूज 

अकलूज : ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या  वयोश्री योजनेचे फॉर्म स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिली. यावेळी प्राथमिक स्वरूपात काही ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यात आले. यावेळी उपमुख्यअधिकारी जयसिंह खुळे कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

मुख्याधिकारी गोरे म्हणाले, महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे याविषयी नागरिकांना अधिक माहिती व फॉर्म भरणे सुलभ होण्यासाठी अकलूज नगर परिषदेच्या वतीने नगरपरिषद कार्यालयात उद्या शनिवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अक्षमतेनुसार साहित्य खरेदी करण्यासाठी 3000/- रू पर्यंत शासनामार्फत अनुदान देण्यात येणार आहे. शिबिरासाठी येताना फॉर्म भरण्यासाठी 2 पासपोर्ट साईझ फोटो, आधार कार्ड , रेशनकार्ड , बँक खाते या कागदपत्रांची झेरॉक्स सोबत आणणे गरजेचे असल्याचे सांगतानाच मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी वयोश्री योजनेच्याफॉर्म भरण्याच्या शिबिराचा अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!