गणेशोत्सव आणि गौरी गणपती च्या स्वागतासाठी बाजारपेठेत उत्साह ; सजावटीच्या साहित्यासाठी नागरिकांची गर्दी
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : गणेशोत्सव आणि गौरी गणपतीच्या आगमनानं बाजारपेठेत जोरदार उत्साह दिसून येत आहे. यावेळी बाजारात गणपतीच्या मूर्ती, सजावटीचे साहित्य, आरास आणि पूजेच्या आवश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. विशेषत: पर्यावरणपूरक गणपती मूर्ती, मातीच्या गणपती, तसेच इको-फ्रेंडली सजावट साहित्याची मागणी वाढली आहे.
गौरी गणपतीसाठी सजावटीचे आयटम्स, फुलं, हार, पारंपरिक कपडे आणि पूजेच्या विविध वस्तू बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. लोकांना गणपतीच्या मूर्तीसोबतच सजावटीला देखील विशेष महत्त्व देताना दिसते. याशिवाय मिठाई, खासकरून मोदक आणि लाडू यांचीही मागणी वाढली आहे, कारण हे गणेशोत्सवाचे मुख्य प्रसाद मानले जातात.
उत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू असून विजय चौक स्विमिंग टॅंक समोरील शहा एंटरप्राइजेस या दुकानाला ग्राहकांची पसंती असल्याचे दिसून येत आहे. नवनवीन रंगीबेरंगी सजावटीच्या साहित्यामुळे ग्राहक दुकानाकडे आकर्षित होत असल्याचे दिसत आहे.