शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात औषध फवारणी पंप व वॉटर फिल्टर वाटपाचा शुभारंभ ; अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपक्रम
महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना औषध फवारणी पंप व वाटर फिल्टर चे वाटपाचा शुभारंभ सभापती सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
नेहमीच शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने नवीन उपक्रम हाती घेतला असून या अंतर्गत शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात औषध फवारणी पंप व वाटर फिल्टर चे वाटप करण्यात येत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य मारुतराव उर्फ आप्पासाहेब रुपनवर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोर उभारण्यात आलेल्या स्टॉलमध्ये शेतकऱ्यांना 50% दरामध्ये आयएसआय मार्कचे नामांकित कंपनीचे औषध फवारणीचे बॅटरी पंप व वॉटर फिल्टरचे वाटप 2 सप्टेंबर पर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती सचिव राजेंद्र काकडे यांनी दिली.
यावेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य श्री बाबुराव कदम, पोपट भोसले, आनंद फडे, सुधीर सुरवसे, उद्धव ठाकरे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.