शंकरनगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आयोजित कपिंग थेरपी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; २४७ गरजू रूग्णांनी घेतला लाभ
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : शंकरनगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आयोजित कपिल थेरपी शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल २४७ गरजू रुग्णांनी लाभ घेतला आहे. कपिल थेरपीमध्ये गुडघेदुखी, पाठदुखी, स्नायु आखडणे व सांध्यांमधील वेदना यावरती उपचार केला जातो.
या शिबीराचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.अमोल आव्हाड, डॉ.शैलेश देवकर, निसर्गोपचार तज्ञ डॉ.अनिल काळे, डॉ.प्रणाली तपकिरे, डॉ.आसिप मकानदार, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. संभाजी गंगधरे, विलास झुरळे, महादेव दडस, अमोल सावंत, विराज पालवे उपस्थित होते.
कपिंग थेरपीचे तज्ञ डॉ.अनिल काळे यांनी थेरपी विषयी माहिती सांगताना म्हणाले, केसांपासुन नखांपर्यंतचे सर्व आजार या कपिंग थेरपीद्वारे बरे केले जाऊ शकतात. सांध्यांच्या ज्या भागामध्ये वेदना होतेय त्या ठिकाणी हे कप लावायचे. त्या कपातील हवा ओढुन घ्यायची. त्यामुळे ज्या भागात वेदना होते त्या भागातील मांस वरती खेचले जाऊन वेदनेच्या ठिकाणी रक्त पुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे त्या भागात वेदना होण्याचे थांबते. या थेरपीचा वापर केल्यास वयस्कर नागरीक वेदनांपासुन मुक्त होतील.
मदनसिंह मोहिते-पाटील यांनी स्वतः या थेरपीद्वारे यशस्वी उपचार घेतल्याने त्यांनी वेदनामुक्तीसाठी ही पध्दत सर्वांनी वापरावी. शंकरनगर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सदरचे कपिंग थेरपी किट उपलब्ध करण्यात आले आहे. या भागातील आशा सेविकांनाही हि उपचार पध्दती शिकवण्यात आली असून त्यांच्याद्वारेही परिसरातील नागरीकांनी उपचार करून घेण्याचे आवाहन केले. या शिबीराचा सुमारे २४७ नागरीकांनी लाभ घेतला.