ज्येष्ठ फोटोग्राफर श्रीपतराव गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्कार जाहिर
महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : येथील ज्येष्ठ फोटोग्राफर श्रीपतराव गायकवाड अर्थात गायकवाडमामा यांना फोटोग्राफर बहुउद्देशीय संघ शहर जिल्हा सोलापूर यांच्या वतीने फोटोग्राफी क्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ कार्याचा गौरव करण्यासाठी प्रतिष्ठित असा जीवनगौरव पुरस्कार जाहिर झाला असून दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी शिवस्मारक सभागृह एसटी स्टँड जवळ, शिंदे चौक, सोलापूर. येथे सकाळी 10 वा. दरम्यान समारंभात आपणास प्रदान करण्यात येणार आहे.
श्रीपतराव गायकवाड (गायकवाड मामा) माळशिरस तालुक्यात फोटोग्राफीचे पितामह(वय वर्ष 89) म्हणूनच ओळख आहे. अजून फोटोग्राफी करतात. राजू स्टुडिओमधुन या माळशिरस तालुक्यात अनेक फोटोग्राफर निर्माण झाले व तसेच बाहेरील शहरातील गुलबर्गा बारामती, पुणे, कोल्हापूर, विजापूर बरेच कलाकार तयार होऊन स्वतःच्या पायावर उभे आहेत. कै. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी राजू स्टुडिओचा पाया बांधला आणि दुकानाचे ओपनिंग केले. त्यामुळे आज तागायत अनेक स्टुडिओ राजू फोटो स्टुडिओ च्या माध्यमातून उभे झाले. महर्षी काकांपासून पासून ते आत्ताच्या चौथ्या पिढीपर्यंत गायकवाड बंधू यांची तिसरी पिढी फोटोग्राफर फोटोग्राफी करत आहेत. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या लग्नाची फोटोग्राफी सुद्धा मामांनीच केली व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या लग्नाचे फोटोग्राफी त्यांचे पुत्र मिलिंद गायकवाड यांनी केली.
मामांनी अनेक फोटोग्राफरचे लग्न लावून दिले आहेत अनेकांचे संसार मामांनी उभे केले आहेत. मामांची मुलं शेखर आणि मिलिंद या दोन बंधूंनी सुद्धा मोलाची कामगिरी आहे यांनी सुद्धा अनेक फोटोग्राफर तयार केले आहेत.
सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटील त्यांच्यापासून ते सध्या चौथ्या पिढी पर्यंतचा माळशिरस तालुक्याच्या राजकीय, सहकार, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि इतर जडणघडणीचा इतिहास छायाचित्र (फोटो )स्वरूपात जतन करून नव्या पिढीला पाहता यावा यासाठी आपले अखंड आयुष्य खर्ची टाकणारे गायकवाड मामा माळशिरस तालुकाच नव्हे तर सोलापूर जिल्ह्याला परिचित आहेत. त्यांचा होत असलेला गौरव माळशिरस तालुक्यासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे.