Latest News

डॉ.श्रद्धा जवंजाळ यांच्या सामाजिक कार्याचा गौरव ; राष्ट्रीय बाल व महिला विकास परिषदेच्या महासचिव पदी नियुक्ती

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात 

अकलूज : महिलांसाठी विशेष उपक्रम राबवून सामाजिक कार्यात झोकून दिलेल्या अकलूज येथील डॉक्टर श्रद्धा जवंजाळ यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात येत असून राष्ट्रीय बाल व महिला विकास परिषदेच्या राष्ट्रीय महासचिव पदी अकलूज येथील डॉक्टर श्रद्धा जवंजाळ यांची निवड करण्यात आली आहे.राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बिरेन दवे यांनी  याबाबतची घोषणा केली.

राष्ट्रीय बाल व महिला कल्याण परिषदेचे मुख्य कार्यालय दिल्ली, आंतरराष्ट्रीय कार्यालय लंडनमध्ये व प्रशासकीय कार्यालय केरळ राज्यात असून या परिषदेने महिला व बालकल्याण यांचा विकास होण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बिरेन दवे मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तेरा संस्थांवर काम पहात असून त्यांना आंतरराष्ट्रीय पॅडमॅन म्हणून ओळखले जाते तसेच या परिषदेचे चेअरमन ॲड. डॉ.के.विजया राघवन आहेत.

 डॉ.श्रद्धा जवंजाळ या एलिमिनेशन ऑफ सर्वाइकल कॅन्सर फ्रॉम इंडिया या विषयावर सध्या नऊ ते वीस वयोगटातील मुलींना मोफत एचपीव्ही लसीकरण राज्यात विविध ठिकाणी शिबिरे घेऊन याबाबत जागरूकता करत असतात गर्भाशयाच्या कॅन्सर हा महिलांमधील मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आजार असून राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर या माध्यमातून काम करण्याची संधी त्यांना उपलब्ध झाली आहे. या संधीचे ते निश्चित सोने करून दाखवतील असा विश्वास त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!