मॉडेल विविधांगी प्रशालेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे विविध उपक्रम राबवून शिक्षण सप्ताहाची सांगता
महर्षि डिजीटल न्यूज
माळीनगर : येथील दि मॉडेल विविधांगी प्रशाला माळीनगर येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे विविध उपक्रम राबवण्याबरोबरच प्रशालेतील विद्यार्थ्यांना स्नेह-भोजन देऊन शिक्षण सप्ताहाची उत्साहात सांगता करण्यात आली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण,२०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण विभागाने राज्यात दि.२० जुलै २०२४ ते २८ जुलै २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यास सांगितले होते. त्यानिमित्ताने दि मॉडेल विविधांगी प्रशालेत या सप्ताहाच्या काळात अध्ययन-अध्यापन दिवस,मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडादिवस,सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस,इको क्लब दिवस असे कार्यक्रम घेण्यात आले.
रविवार दि.२८ जुलै २०२४ रोजी समुदाय सहभाग दिवस व सप्ताहाची सांगता म्हणून प्रशालेच्या इ.५ वी ते इ.१२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी विद्यांजली,स्नेह-भोजन या कार्यक्रमाचे आयोजन दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी माळीनगर या शिक्षण संस्थेचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांचे मार्गदर्शनाखाली सेक्रेटरी अजय गिरमे यांनी स्वतः लक्ष घालून तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यासर्वांच्या मदतीने करण्यात आले.विद्यार्थ्यांना पुरी,जिलेबी,पात्तळ भाजी,सुकी भाजी,पुलाव,भजी, कोशिंबीर हे भोजन टेबल खुर्चीवर देण्यात आले.यावेळी विद्यार्थी, पालक,शिक्षक अशा जवळपास १५०० जणांनी भोजनाचा मनमुराद आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे उदघाटन अकलूज केंद्राचे केंद्र प्रमुख आर.बी.जाधव यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.यावेळी
एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अजय गिरमे, खजिनदार ज्योतीताई लांडगे, संचालक ऍड.सचिन बधे,डॉ.अविनाश जाधव,पृथ्वीराज भोंगळे, कल्पेश पांढरे, तसेच प्रशालेचे प्राचार्य कल्लाप्पा बिराजदार,उपप्राचार्य रितेश पांढरे,माजी प्राचार्य प्रकाश चवरे,पर्यवेक्षक कल्याण कापरे,राजीव देवकर तसेच शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी,पालक उपस्थित होते.यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम बाळासाहेब सोनवणे,जगन्नाथ कोळी यांनी घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बांदल यांनी केले.स्नेह-भोजनाच्या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षिका,क्लार्क, शिपाई कर्मचारी,वॉचमन सर्वांनी परिश्रम घेतले.