जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण ; दुभाजकाच्या मध्ये ३२०० तर दुतर्फा ३५०० वृक्षांचे रोपण
महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, जी एच व्ही इंडिया लिमिटेड व शिवरत्न कन्स्ट्रक्शन च्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग अकलूज ते तोंडले या मार्गावर आज अकलूज चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, प्रांताधिकारी विजया पांगारकर, प्रोजेक्ट डायरेक्टर केशव घोडके यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
एक पेड मां के नाम या अभियानांतर्गत संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या दुतर्फा बाजूस वृक्षारोपण करण्याची मोहीम सध्या सुरू असून माळशिरस तालुक्यातून जाणाऱ्या अकलूज ते तोंडले दरम्यान तब्बल ३५०० वृक्षांचे रोपण करण्याचा शुभारंभ आज करण्यात आला. यामधे वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब, बांबू या रोपांचा समावेश आहे.
तसेच महामर्गाच्या मधील दुभाजकावर बोगन वेल, पिकोमा, कॅलेंड्रीया, टॅफिया या शो च्या ३२०० झाडांच्या रोपनाचा शुभारंभ ही यावेळी करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शाळा गट नंबर दोन मधील विद्यार्थी, शिक्षक व महाळुंग, तांबवे परिसरातील नागरिक, शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना, प्रोजेक्ट डायरेक्टर केशव घोडके म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकारी कर्मचारी, जी एच व्ही इंडिया कंपनी, शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनी बरोबरच परिसरातील विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांनीही रोपण केलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याबरोबरच त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. या वृक्षामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाणार आहे.