शहर

प्रताप क्रीडा मंडळाच्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न ; नऊ जिल्ह्यातून ११२५ खेळाडूंचा सहभाग 

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात 

अकलूज : प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर अकलूज यांच्यावतीने श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने आणि जयसिंह  मोहिते-पाटील व   मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाटचाली निमित्त स. म. शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकरनगर, अकलूज येथे आयोजित केलेल्या  ‘रत्नाई चषक’ राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.   सहा. मोटार वाहन निरीक्षक  डॉ. राजकुमार देशमुख व मंडळाच्या अध्यक्षा  कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष पोपट भोसले-पाटील, प्राचार्य प्रवीण ढवळे, सचिव बिभीषण जाधव, स्पर्धा प्रमुख अभिजित बावळे व मंडळाचे सर्व संचालक,सदस्य उपस्थित होते. 

                       मंडळाचे संस्थापक  जयसिंह मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवित आहेत. 

                   यावेळी अध्यक्षीय मनोगतात डाॅ.राजकुमार देशमुख म्हणाले की, मी प्रताप क्रीडा मंडळाचा माजी खेळाडू आहे. अभ्यासाबरोबरच जीवनात यशस्वी होण्यासाठी खेळ ही महत्त्वाचा आहे. खेळामुळे संयम, जिद्द, चिकाटी हे गुण आत्मसात होतात व त्यामुळे यश प्राप्त होते. राज्य देश व राष्ट्रीय पातळीवर प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेत वर्ग पाच टक्के आरक्षण आहे. 

       मंडळाच्या अध्यक्षा स्वरुपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या की, प्रताप क्रीडा मंडळाच्या माध्यमातून १९९४ पासून गेली तीस वर्ष स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, मुंबई, लातूर, धाराशिव आदी जिल्ह्यातून ११२५ खेळाडूंनी उच्चांकी सहभाग घेतला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी छंद जोपासणे ही काळाची गरज आहे. स्पर्धेमुळे आत्मविश्वास निर्माण होतो.         

               स्पर्धा १० वर्षे वयोगट, १६ वर्षे वयोगट व खुला गट अशा तीन गटांसाठी आयोजित केली होती. या तिन्ही गटात माळशिरस तालुक्याच्या खेळाडूसाठी स्वतंत्र बक्षीसे होती. 

   स्पर्धेतील गटनिहाय  प्रथम पाच क्रमांक  पुढीलप्रमाणे- (१० वर्ष तालुकाबाह्य गट) : श्रेयस कुदळे, सोलापूर  , सिद्धांत कोठारी, बार्शी, ओम निरंजन, सोलापूर, विहान कोंगारी, सोलापूर , शौर्य कणसे,फलटण. 

(१० वर्ष माळशिरस तालुका गट)    : अनन्या बाळापुरे,उघडे वाडी, , ओम राऊत,  अखिलेश भगत,अकलूज, अनहिता काळे, माळशिरस, किरण राजगे, अकलूज 

(१६ वर्ष तालुकाबाह्य) : सागर पवार, वैराग,  साईराज घोडके, सोलापूर , रुद्र फुले, बारामती , अंश खैरे, सोलापूर ,जानवी साळवी, सोलापूर 

(१६ वर्ष माळशिरस तालुका): रक्षिता जाधव,  पार्थ पटेल, अमेय जामदार, अथर्व बोरावके , यश कुंभार,सर्व अकलूज.

(खुला तालुकाबाह्य गट) : दिपांकर कांबळे,फलटण,  विजय पंडुवाले, सोलापूर , राज दुधाळ , बार्शी , अमर शिंदे, प्रथमेश शिंदे, बारामती.

(खुला माळशिरस तालुका  गट)  : संतोष जगताप, माळीनगर, स्वप्निल लोंढे , माळीनगर, शुभम शिंदे पाटील, खंडाळी,   विवेक माने, अमोल तरटे,अकलूज

        स्पर्धेत प्रत्येक गटासाठी स्वतंत्र एकूण ३० बक्षिसे देण्यात आली.या मध्ये प्रथम दहा क्रमांकांना सन्मान चिन्ह व रोख बक्षीसे तर ११ ते १५ या क्रमांकांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येऊन गौरविण्यात आले.तर स्पर्धेतील सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आले.

             या स्पर्धेत उत्कृष्ट पुरुष खेळाडू दादासाहेब पराडे, विनोद रणसुंबे, विराज कांबळे यांना तर उत्कृष्ट महिला खेळाडू शितल पराडे, आश्लेषा माने, शुभांगी भगत व सर्वात लहान खेळाडू  मनश्री पाटील, अर्जुन सातारकर, स्वानंदी कणसे व अद्विक ठोंबरे यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.             

     सर्वाधिक सहभागी स्पर्धक असणारी प्रशाला म्हणून  महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनंगर या प्रशालेस गौरविण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी सन्मान स्वीकारला.  तर सर्वाधिक सहभागी स्पर्धक अकॅडमी म्हणून ब्रिलियंट चेस अकॅडमीच्या सौ. अनिता बावळे यांना सन्मानीत करण्यात आले. स्पर्धेत धाराशिव चे ७६ वर्षाचे वयोवृद्ध खेळाडू बाबुराव शेळके यांनीही सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी ६० कॅश प्राईज, १०१ ट्रॉफीज, १०१ मेडल तसेच प्रत्येक गटात ६० पेक्षा अधिक बक्षिसे देण्यात आली.

पंच म्हणून उदय वगरे, जितेंद्र वाळिंबे, युवराज पोगुल, रोहिणी तुम्मा, संध्याराणी सस्ते, दीपक क्षीरसागर, नामदेव कणसे, अक्षय कांबळे, संग्रह कांबळे, राहुल बोराटे, नितीन अग्रवाल, अली शेख, प्रभावती लंगोटे, अनिता बावळे यांनी काम पाहिले. प्रास्ताविक स्पर्धा प्रमुख अभिजित बावळे यांनी केले. सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी , राजकुमार पाटील यांनी केले.

 प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या  राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उच्चांकी स्पर्धकांनी सहभाग घेतला.त्यांना मिळालेल्या सर्व सुविधा व स्पर्धेचे झालेले अचूक नियोजन यामुळे पालक भारावले. व त्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले.या साठी पालकांच्या वतीने मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!