शहर

बुद्ध जयंतीचे नियोजन करण्यासाठी शनिवारी अकलूज येथे बैठक ; बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन 

महर्षि डिजीटल न्यूज 

अकलूज : जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या २३ मे  रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंतीच्या निमित्ताने बुद्ध महोत्सव साजरा करण्यासाठी अकलूज येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

 सालाबाद प्रमाणे यंदाही सारनाथ बुद्ध विहार अकलूज येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी होत आहे. सदर बुद्ध जयंती महोत्सवाचे नियोजन करण्यासाठी सारनाथ बुद्धविहार अकलूज, येथे शनिवार दिनांक 27- 4 -2024 रोजी सायंकाळी ठीक 7-30 वाजता महत्त्वाची मिटिंग आयोजित करण्यात आली असल्याचा संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला आहे. या मिटिंगसाठी सर्व बौद्ध बांधवांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!