शहर

इनरव्हील क्लब अकलूज व पिंक रेवोल्युशन यांच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त अकलूज येथे मुली व महिलांची निघणार बाईक रॅली 

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात

अकलूज : इनरव्हील क्लब अकलूज व पिंक रेवोल्युशन यांच्यातर्फे एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे 4वाजता मुलींची व महिलांची टू व्हीलर नऊवारी बाइक रॅली चे आयोजन केल्याची माहिती आयोजक डॉ.श्रद्धा राहुल जवंजाळ यांनी दिली.

त्या पुढे बोलताना म्हणाल्या की,दिवसेंदिवस महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे तर जगात महिलांमध्ये स्तनाच्या व गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वेगाने वाढत चाललेले आहे.यासंदर्भात जनजागृतीसाठी मुलींनी व महिलांनी स्वतःच्या आरोग्यासाठी एक दिवस अशा पद्धतीची  रॅली काढण्यात येत आहे. गर्भाशयाचा कर्करोगाबद्दल माहिती घेऊन स्वतःचे तसेच तुमच्याबरोबरच्या महिलेचे आयुष्य वाचवण्याची संधी तुम्हाला मिळत आहे.एचपी लसीकरणाविषयी माहिती व रजिस्ट्रेशन याच दिवशी आपण करणार आहोत.

त्याचबरोबर अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी सर्व मुली व महिलांना आहे. या रॅली मध्ये सोलापूर जिल्ह्यातील महिला व मुली सहभागी होऊ शकतात.यामध्ये प्रत्येक मुली असो किंवा महिला त्यांना नऊवारी साडी घालने व एक घोषवाक्य  स्तनाच्या व गर्भाशयाच्या कॅन्सरवर स्वतःच्या सोबत असणं बंधनकारक आहे .

सहभागी प्रत्येक महिला व मुलींना मेडल व ई सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. तसेच तीन प्रथम नंबर सोन्याची नथ तीन द्वितीय नंबर पैठणी तीन तृतीय नंबर चांदीचे नाणे अशा स्वरूपात बक्षिसे आहेत आहेत . सर्वात बेस्ट घोषवाक्य-3 नंबर काढण्यात येतील. सुंदर गेटअप नऊवारी मधील-3 नंबर काढण्यात येतील. सर्वात मोठा ग्रुप एकसारखे सुंदर गेटअप असणारा 1 नंबर काढण्यात येणार 10,000 रोख रक्कम. 25 लकी ड्रॉ काढण्यात येतील. ज्याची बाईक वेगळी असेल असे 3 नंबर काढण्यात येतील. तसेच उत्कृष्ट बहिरव व उत्कृष्ट बाईक असणाऱ्या जेष्ठ महिलेला इनर्व्हील सुपर ट्रॉफी देण्यात येणार आहे.

तरी जास्तीत जास्त मुली व महिलांनी यामध्ये सहभाग घेऊन या जनजागृती मध्ये आपला हातभार लावावा. याच्यासाठी स्पॉन्सर्स धनलक्ष्मी ज्वेलर्स, रूपा साडी सेंटर, चैतन्य अलंकार श्रीपुर ,वात्सल्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, स्मार्ट शॉपी व सहारा इन्स्टिट्यूट अकलूज हे आहेत. इनरव्हील क्लब अकलूज च्या अध्यक्ष डॉक्टर श्रद्धा राहुल जवंजाळ सचिव डॉक्टर अदिती थिटे तसेच आयएसओ सौ अमोलिका जामदार यांनी आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!