शहर

बाजारात सेल्फी पॉइंट तर मुख्याधिकाऱ्यांची सायकल रॅली ; अकलूज नगरपरिषदेकडून मतदारांची जनजागृती

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात

अकलूज : मतदानाचा हक्क अधिकाधिक नागरिकांनी बजावून मतदानाची टक्केवारी वाढावी व मतदान शांततेत पार पाडावे यासाठी अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा मतदार जनजागृती नोडल अधिकारी दयानंद गोरे विशेष प्रयत्न करताना दिसत असून अकलूज शहराच्या मुख्य बाजारात त्यांनी सेल्फी पॉइंट उभा केला असून आज परिसरातून सायकल रॅली काढून मतदारांमध्ये जनजागृती केली आहे.

लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने अकलूज सोमवार बाजारात SVEEP (स्वीप) कार्यक्रम अंतर्गत सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. अकलूज च्या सोमवार बाजारात माढा लोकसभा मतदार संघातील विविध गावातून शेतकरी,व्यापारी आपले साहित्य विकण्यासाठी येत असतात. त्याच अनुषंगाने आज स्वीप नोडल अधिकारी यांचे पथकामार्फत मतदार जनजागृती अभियान सेल्फी पॉईंट तयार करून राबविण्यात आले.यामध्ये नागरिकांनी उस्फूर्तपणे गर्दी केली होती. तसेच नागरिकांनी स्वतः हून आप आपल्या भागात मतदान करणार आणि आपल्या शेजारील परिसरातील मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणार असे सांगितले. दिनांक ७ मे रोजी आपल्या माळशिरस भागातील मतदान असून आम्ही सर्व मतदार आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावणार आहे अशी शपथ सर्व नागरिक व व्यापारी यांनी घेतली.

तर आज सकाळीच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना घेऊन मुख्याधिकारी मतदार जनजागृती नोडल अधिकारी दयानंद गोरे यांनी अकलूज परिसरातील विविध भागांत सायकल द्वारे फिरून जनजागृती केली. यावेळी त्यांच्या सोबत कर निरीक्षक राजाराम नारुटे, सहाय्यक नोडल अधिकारी धोंडीराम भगनुरे, अधिकारी बाळासाहेब वाईकर, सुनील काशीद यांच्यासह विविध विभागाचे ६० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहे होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!