शहर

शिखर शिंगणापूर यात्रेनिमित्त मुंगी घाट, भवानी घाट, गुप्तलिंगाची उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून पाहणी

महर्षि डिजीटल न्यूज 

नातेपुते : शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेचा मुख्य दिवस दि. १८, १९, २० एप्रिल असून, त्या पार्श्वभूमीवर अकलूजचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, नातेपुते पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महारूद्र परजणे यांनी मुंगी घाट, भवानी घाट, गुप्तलिंग अशा पाच ठिकाणांची पाहणी केली.

सहायक पोलिस निरीक्षक मदने, पीएसआय विक्रम दिघे, पीएसआय मनीषा महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ९५ पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. २० एप्रिल रोजी मुंगी घाट (कोथळे, ता. माळशिरस) येथे मराठवाडा, विदर्भासह खळद, एकतपूर, शिवरी, बेलसर, सासवड, मावळ, संत तेली भुतोजी बुवा तसेच आसपासच्या परिसरातील मानाच्या कावडी हजारो भक्तांसोबत मुंगी घाटातून मानवी साखळीद्वारे कोथळे (ता. माळशिरस, जि.सोलापूर) हद्दीतून शिखर शिंगणापूर सातारा हद्दीत घाटातील तीन खडतर टप्पे चढून वर जातात. शिंगणापूर-कोथळे रस्ता या तीन ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था केली आहे. नांदूक, कोथळे, मुंगी घाट, पायता, गुप्तलिंग तसेच भवानी घाटात वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दिवस व रात्रपाळीसाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या नेमणुका त्याठिकाणी करण्यात येणार असल्याचेही परजणे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!