Latest News

शरद पवारांचे सारथ्य शिवतेजसिंहांकडे ; प्रचाराच्या विविध आघाड्यांवर महत्वपूर्ण भूमिका , जबाबदारी वाढली

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात

मोहिते पाटील परिवारातील शेंडेफळ म्हणून ओळखले जाणारे शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी राज्यातीलच नव्हे तर देशातील एक दिग्गज नेते म्हणून ओळख असलेले शरद पवार यांच्या गाडीचे सारथ्य केल्याने त्यांच्यावरील जबाबदारी वाढल्याचे चर्चा सुरू झाली आहे.

माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील यांचा काल सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षात प्रवेश पार पडला. यानिमित्ताने दुपारी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेण्यासाठी शरद पवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी शिवरत्न बंगला येथे त्यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली.

दरम्यान शरद पवार यांचे हेलिकॉप्टरने अकलूज माळेवाडी येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या प्रांगणात तयार करण्यात आलेल्या हेलिपॅड वर आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले तर त्या दोघांना घेऊन माळेवाडी ते शिवरत्न बंगला दरम्यानच्या प्रवासाचे सारथ्य शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी केले.

अकलूज ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकीर्दील सुरुवात केलेल्या शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी आपले वक्तृत्व नेतृत्व आणि कर्तुत्वाच्या जीवावर केवळ माळशिरस तालुक्यातूनच नाहीतर सोलापूर जिल्ह्यातील नेते व जनतेच्या मनात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळत असतानाच राजकीय क्षेत्रात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या कर्तुत्वाचा व विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम शिवतेजसिंह अगदी तळमळीने करताना दिसत आहे. लोकात मिसळण्याची त्यांची हातोटी व अबाल वृद्धांना आकर्षित करणारे पर्सनॅलिटी यामुळे त्यांच्या भोवती नेहमी च नागरिकांचे वलय राहिलेले पाहायला मिळत असते.

सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी जोरदार चालू असून माढा लोकसभेतून त्यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गेल्या काही महिन्यात धैर्यशील मोहिते पाटील यांच्याबरोबरच शिवतेसिंह मोहिते पाटील यांनीही माळशिरस तालुक्याबरोबरच माढा विधानसभा मतदारसंघात प्रचाराची एक फेरी पार पाडली आहे. शरद पवार यांचे सारथ्य व प्रचाराच्या विविध आघाड्यांवर असलेला त्यांचा सहभाग धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणार यात शंका नसल्याची चर्चा या निमित्ताने ऐकायला मिळत आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!