शहर

मोक्कासह सात गुन्ह्यात फरार आरोपीला अकलूज पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : मोक्क्यासह इतर सात गुन्ह्यात फरार असलेल्या रोहित थोरात या आरोपीला अकलूज पोलिसांनी मोठ्या शिताफीने व धाडसाने पकडले असून त्याला वेळापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी वेळापूर पोलिसांचेही सहकार्य मिळाले असल्याची माहिती अकलूज पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काल दि.20 मार्च 2024 रोजी रात्री 8.30 ते 8.45 वाजण्याच्या सुमारास अकलूज पोलिस स्टेशनचे पोलिस पोलीस हेडकॉन्स्टेबल सुहास क्षीरसागर, समीर पठाण व संदेश शीकतोडे यांना वेळापूर पोलिसांच्या मार्फत मिळालेल्या खबरीच्या अनुषंगाने टेंभुर्णी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 786/23 आयपीसी 307 आर माय 25 वगैरे मधील फरारी आरोपी रोहित थोरात राहणार उघडेवाडी ता.माळशिरस हा अकलूज मार्गे पुण्याला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता.

उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर व पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली माळेवाडी कॉलेज नजीकच्या बायपासवर पोलीस हेडकॉन्स्टेबल सुहास क्षीरसागर, समीर पठाण व संदेश शीकतोडे यांनी सापळा रचला व दुधाच्या टँकरमधून पुण्याला पसार होण्याच्या मार्गावर असलेल्या फरार आरोपील रोहित थोरात याला ताब्यात घेतले.

त्याची प्राथमिक चौकशी करून वेळापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राऊत व पोलिस हेड कॉन्स्टेबल देशमुख यांच्या ताब्यात देण्यात आले. सुहास क्षीरसागर, समीर पठाण व संदेश शीकतोड यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे पोलिस दलात कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!