धैर्यशील मोहिते पाटील यांचे बळकट करण्या हात ; शिवतेजसिंह यांचा माढ्यात तुफानी झंजावात
महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : सदैव नागरिकांच्या संपर्कात असणारे मोहिते पाटील कुटुंब लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड ऍक्टिव्ह मोडवर दिसत असून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्यानंतर अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनीही त्यांचे हात बळकट करण्यासाठी माढा तालुक्यात आपला झंजावात सुरू केला आहे.
गेल्या तब्बल पाच ते सहा महिन्यापासून शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी संपूर्ण माढा विधानसभा मतदारसंघ तब्बल दोन ते तीन वेळा पिंजून काढला आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून मतदार संघातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याबरोबरच तेथील ज्येष्ठ कार्यकर्ते व युवा मतदारांना आपलेसे करून घेण्यात त्यांना प्रचंड यश मिळताना दिसत आहे.विविध सामाजिक उपक्रम क्रीडा महोत्सव लग्न समारंभ अशा विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा आठवड्यातून किमान चार दिवस माढा विधानसभा मतदारसंघाचा दौरा सुरू असलेला पाहायला मिळतो.
भारतीय जनता पक्षाकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राजकीय खलबते झाल्यानंतर धैर्यशील मोहिते-पाटील, शितलदेवी मोहिते-पाटील यांच्यासह शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनीही संपूर्ण मतदार संघाचा पुन्हा एकदा दौरा सुरू केला आहे.
माढा विधानसभा मतदार संघातील माजी आमदार धनाजी साठे, शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजीराव सावंत, पृथ्वीराज सावंत, ऋतुराज सावंत, रामकाका मस्के, शिवाजीराजे कांबळे, भारतनाना पाटील, रिपब्लीकन पार्टीचे उपाध्यक्ष अमर माने, कुर्डूवाडी येथील माजी नगरसेवक संतोष भिसे, कुर्डूवाडी येथील शिवसेना शहर प्रमुख शिंदे गट, समाधान दास, कुर्डूवाडी येथील माजी नगराध्यक्ष जगन्नाथबापू क्षीरसागर, माढा येथे नगरसेवक शहाजीआण्णा साठे, मा.जी.प.सदस्य अनंतराव कानडे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन शिवतेजसिंह यांनी त्यांची मते जाणून घेतली.
शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या माढा मतदार संघातील दौर्यामुळे धैर्यशील मोहिते-पाटील यांना हत्तीचे बळ मिळणार असून या निमित्ताने शिवतेजसिंह यांनी जिल्ह्याच्या राजकारणत पाऊल ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे ऐकायला मिळत आहे.