सहकार महर्षि कारखान्याच्या 9 लाख 71 हजार 171 व्या साखर पोत्याचे विजयदादांच्या हस्ते पूजन
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चालू गाळप हंगामात उत्पादित झालेल्या 9 लाख 71 हजार 171 व्या साखर पोत्याचे पूजन माजी उपमुख्यमंत्री व कारखान्याचे मार्गदर्शक संचालक विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या हस्ते तसेच बगॅसवर आधारीत 33 मे. वॅट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पामधून आतापर्यंत एक्स्पोर्ट (विक्री) केलेल्या 4 कोटी 55 लाख 55 हजार 555 वीज विक्री युनिटचे पूजन कारखान्याचे संचालक संग्रामसिंह अजितसिंह जहागिरदार यांचे हस्ते संपन्न झाले.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
कारखान्याचा सिझन 2023-2024 चा ऊस गळीत हंगाम दिनांक 01/11/2023 रोजी सुरु झाला असून दि. 12/03/2024 अखेर 9 लाख 86 हजार 100 मे.टन ऊसाचे गाळप होऊन 9 लाख 60 हजार 900 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले असून साखर उतारा सरासरी बी-हेवीसह 10.76 % आहे.
चालू सिझन 2023-2024 मध्ये को-जन वीज निर्मिती प्रकल्प दिनांक 28/10/2023 रोजी सुरु झाला असून दि.12/03/2024 अखेर त्यामध्ये वीज 7 कोटी 97 लाख 43 हजार 918 युनीट निर्माण झाली असून त्यामधुन वीज विशी 4 कोटी 66 लाख 87 हजार 921 युनिट केलेली आहे. तसेच उपपदार्थ प्रकल्प डिस्टीलरीमध्ये दि.12/03/2024 अखेर बी-हेवी पासून 1 कोटी 29 लाख 68 हजार 517 लिटर्स व सी-हेवी पासून 11 लाख 71 हजार 479 लिटर्स रेक्टीफाईड स्पिरीट तसेच बी-हेवी पासून 1 कोटी 22 लाख 32 हजार 660 लिटर्स व सी-हेवी 7 लाख 78 हजार 786 लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले आहे. अॅसेटीक अॅसिड प्लॅटमध्ये 259.500 मे.टन अॅसिटाल्डीहाईड व 287.800 मे.टन अॅसिटीक अॅसिडची निर्मिती झाली असलेची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.
सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, तसेच संचालक लक्ष्मण शिंदे, विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, संग्रामसिंह जहागिरदार, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, महादेव क्षिरसागर, भिमराव काळे, अमरदिप काळकुटे, गोविंद पवार, सुभाष कटके, जयदिप एकतपुरे, रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक, प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत- पाटील, संचालिका सुजाता शिंदे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, दत्तात्रय चव्हाण, विनायक केचे, राजेंद्र भोसले, धनंजय सावंत, नामदेव चव्हाण, धनंजय दुपडे, श्रीकांत बोडके, सौ. हर्षाली निंबाळकर, श्रीमती पुष्पा महाडीक तसेच माजी संचालक भिमराव काळे, रामचंद्र चव्हाण, विजय माने-देशमुख, राजेंद्र मोहिते, मोहन लोंढे, केशव ताटे, महादेव घाडगे, चांगदेव घोगरे, विठ्ठल ताटे तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले व खातेप्रमुख तसेच कामगार उपस्थित होते.