शिवाजी गाढवे यांचे मरणोत्तर नेत्रदान ; आजवर 52 नेत्रदान झाल्याची डॉ.मुकुंद जामदार यांची माहिती
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : अकलूज परिसरात मरणोत्तर नेत्रदान मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून मयतांच्या नातेवाईकांकडून मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आजवर 52 नेत्रदान यशस्वी झाल्याची माहिती डॉ.मुकुंद जामदार यांनी दिली.
आज अकलूज येथील शिवाजी दत्तात्रय गाढवे यांचे 52 वे नेत्रदान ठरले. वयाच्या 61 व्या वर्षी त्यांचे तीव्र मायोकार्डियल इन्फेक्शनमुळे निधन झाले. अंत्यविधी करण्या अगोदर त्यांच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रूग्णालयाशी संपर्क साधून नेत्रदान केले. शिवाजी गाढवे यांची मरणोत्तर देहदानाची ईच्छाही व्यक्त केली होती परंतु काही अपरिहार्य कारणामुळे त्यांची देहदानाची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
या मोहिमेसाठी डॉ.सूरज महाडिक, सतीश कचरे यांच्यासह गुरुमाऊली आणि आनंदी गणेश चॅरिटेबल ट्रस्ट, अकलूज यांचे विशेष सहकार्य लाभल्याबद्दल डॉ.मुकुंद जामदार यांनी आभार व्यक्त केले.