इस्लामपूर येथे विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंतांचा व पुरस्कार प्राप्त अधिकारी वर्ग यांचा नागरी हस्ते सत्कार
महर्षि डिजीटल न्युज
अकलूज : इस्लामपूर येथे संभाजीबाबा महाशिवरात्र यात्रेच्या निमित्ताने इस्लामपूर(राजापूर) येथे विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंतांचा व पुरस्कार प्राप्त अधिकारी वर्ग यांचा नागरी सत्कार सहकार महर्षि कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, प्रमुख पाहुणे कृषि उत्पन्न बाजार समिती चे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भाजपा चे माळशिरस तालुकाध्यक्ष मामासाहेब पांढरे, नातेपुते नगरपंचायतीचे उप नगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, कृ.उ.बा.स.चे संचालक बाबुराव कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास गाडे, भाजपा चे संदीप घाडगे, सिनेट सदस्य सुरज मस्के, वरपे नाना, अमित पुंज, मानसिंग मोहिते, साहेबराव देशमुख, शिवाजी बर्वे, आनंद शेंडगे, हनुमंत पवार, माणिक देशमुख, बापू जाधव, अशोक देशमुख, महादेव पवार, दगडू देशमुख, दिग्विजय देशमुख, संजय ज्ञानेश्वर देशमुख, पांडूरंग बुधावले, संजय नलावडे, धनाजी आप्पा पवार, युवराज देशमुख, संतोष देशमुख, विजय पवार, अभिजीत मदने, पोपट पवार, कृष्णा देशमुख, हनुमंत देशमुख, प्रफुल्ल जाधव, गणेश देशमुख, शिवाजी देशमुख, अकबर शिकलगार, विकास देशमुख, संग्राम पाटील, अजित पवार, अंकुश पवार, राहुल देशमुख, निलेश देशमुख, गोरख देशमुख, अतुल देशमुख, स्वप्नील पवार, श्रीकांत पवार, अंकुश पवार, राहूल देशमुख, कपील देशमुख, महादेव देशमुख, लक्ष्मण शिंदे, सागर कपडेकर, निलेश पवार, सुनिल देशमुख, मनोज देशमुख, शिवाजी देशमुख, किरण होनमाने, दादा पाटील, प्रथमेश महामुनी आदी मान्यवर उपस्थित होते.
इस्लामपूर गावामधील विविध क्षेत्रामध्ये यश संपादन केल्याबद्दल कुलदीप दिलीपराव माने-देशमुख, पी.एस.आय.वाशी,नवी मुंबई, स्वप्नील विलासराव माने-देशमुख, तांत्रिक सहाय्यक, शालेय पोषण आहार, केंद्र सरकार, डॉ.सौरभ नामदेव माने-देशमुख, MBBS, डॉ.राज दत्तात्रय माने-देशमुख, MBBS, डॉ.श्रुती वैभव महामुनी BHMS, डॉ.पुनम जगन्नाथ पवार BHMS, राजकुमार काळे, ग्रामसेवक पुरस्कार, सोलापूर जिल्हा, संतोष महामुनी, संगीत विशारद, प्रथम क्रमांक, आनंद शेंडगे, उप सरपंच पदी निवड झाल्याबद्दल यांचा नागरी सन्मान ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
त्यावेळी बोलताना मदनसिंह मोहिते पाटील म्हणाले ग्रामविकास युवक मंचने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला असून त्यामुळे नवीन युवा पिढीस प्रेरणदायी ठरेल. सत्कार मुर्तींची प्रेरणा घेऊन आजची युवा पिढी निश्चितपणे आपल्या आदर्श संस्कारांची पाईक होईल. व आपले गावचे नाव उज्वल करेल अशी अपेक्षाही मा.मदनदादांनी व्यक्त केली. संयोजकांनी सदर कार्यक्रम दरवर्षी साजरा करावा. असेही ते म्हणाले. त्यावेळी मालोजीराजे देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
यात्रेचे निमित्ताने ग्रामस्थांसाठी सुभाष हिलगे निर्मित वैभव डान्स म्युझीकल नाईट या मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन ग्रामविकास युवक मंच राजापूर यांचे वतीने करण्यात आलेले होते. मनोरंजन कार्यक्रमास जयसिंह मोहिते पाटील व मदनसिंह मोहिते पाटील यांनीही ग्रामस्थांमध्ये बसून कार्यक्रमास साद दिली. सदर कार्यक्रमास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धनंजय देशमुख यांनी केले.