अनुसूचित जाती व नवबौध्द वस्त्यांच्या विकासासाठी तब्बल ५ कोटी ६२ लाख रुपये मंजूर – आ.रणजितसिंह मोहिते पाटील व आ.राम सातपुते यांची माहिती
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागा मार्फत माळशिरस तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या १०१ वस्त्यांच्या विकासासाठी सुमारे ५ कोटी ६२ लाख इतक्या रकमेस सन २०२३ – २४ मध्ये प्रशाकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ रणजितसिंह मोहिते पाटील व आ राम सातपुते यांनी दिली.
आ मोहिते पाटील व आ राम सातपुते म्हणाले , अनु . जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत सन २०२३ – २४ साठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे . त्यामध्ये माळशिरस तालुक्यातील रस्ते कॉंक्रिटीकरण करणे , गटारी बांधणे , पेव्हिंग ब्लॉक बसविणे , पाणी पुरवठा करणे , समाज मंदिर बांधणे आदी १०१ कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे .
तालुक्यातील आनंदनगर कॉंक्रिट रस्ता करणे दहा लाख , बांगर्डे पेव्हिंग ब्लॉक बसविणे चार लाख , देशमुखवाडी कॉंक्रिट रस्ता करणे पाच लाख , बोरगाव कॉंक्रिट रस्ता , पेव्हिंग ब्लॉक व गटार करणे वीस लाख , बिजवडी पाणी पुरवठा करणे पाच लाख , कोळेगाव समाज मंदिर बांधणे सात लाख , बागेचीवाडी बंदिस्त गटार करणे वीस लाख , बोंडले कॉंक्रिट रस्ता करणे दहा लाख , भांबुर्डी बंदिस्त गटार करणे दहा लाख , चांदापुरी कॉंक्रिट रस्ता करणे पाच लाख ,चौंडेश्वरवाडी कॉंक्रिट रस्ता करणे पाच लाख , मांडवे कॉंक्रिट रस्ता करणे दहा लाख , पळसमंडळ कॉंक्रिट रस्ता व बंदिस्त गटार करणे चार लाख , भांब पेव्हिंग ब्लॉक बसविणे पाच लाख , कोंडभावी बंदिस्त गटार पाच लाख , कोंडारपट्टा पेव्हिंग ब्लॉक बसविणे तीन लाख , चाकोरे कॉक्रिट रस्ता करणे सहा लाख , डोंबाळवाडी कॉंक्रिट रस्ता करणे आठ लाख , खंडाळी कॉंक्रिट रस्ता करणे पाच लाख , दसूर कॉंक्रिट रस्ता करणे दहा लाख , धर्मपुरी पेव्हिंग ब्लॉक बसविणे पाच लाख , दहिगांव कॉंक्रिटरस्ता करणे दहा लाख ,एकशिव कॉंक्रिट रस्ता करणे दहा लाख , फडतरी कॉंक्रिट रस्ता करणे पाच लाख , फोंडशिरस कॉंक्रिट रस्ता करणे दहा लाख , फळवणी कॉंक्रिट रस्ता करणे पाच लाख , गारवाड कॉंक्रिट रस्ता करणे चार लाख , गिरवी कॉंक्रिट रस्ता करणे पाच लाख , गारवाड कॉंक्रिट रस्ता पाच लाख , कदमवाडी पेव्हिंग ब्लॉक बसविणे तीन लाख , खुडूस कॉंक्रिट रस्ता करणे पाच लाख , येळीव कॉंक्रिट रस्ता करणे दहा लाख , पुरंदावडे कॉंक्रिट रस्ताकरणे दहा लाख , तांबेवाडी पेव्हिंग ब्लॉक बसविणे पाच लाख , गुरसाळे कॉंक्रिट रस्ताकरणे पाच लाख , गणेशगाव पेव्हिंग ब्लॉक बसविणे पाच लाख , हनुमानवाडी कॉंक्रिटरस्ता करणे पाच लाख , जाधववाडी कॉंक्रिट रस्ताकरणे पाच लाख , कचरेवाडी पेव्हिंगब्लॉक बसविणे पाच लाख , कुरभावी कॉंक्रिट रस्ताकरणे पाच लाख ,
कळंबोली कॉंक्रिट रस्ताकरणे पाच लाख , कुसमोड पेव्हिंग ब्लॉक बसविणे पाच लाख , लोणंद पेव्हिंग ब्लॉक बसविणे चार लाख , लोंढे मोहितेवाडी कॉंक्रिट रस्ताकरणे पाच लाख , माळीनगर स्ट्रीट लाईट बसविणे दहा लाख , मिरे कॉंक्रिट रस्ताकरणे पाच लाख , लवंग कॉंक्रिट रस्ता करणे दहा लाख , निमगाव मगराचे पाणी पुरवठा व पेव्हिंग ब्लॉक बसविणे पाच लाख , पिरळे कॉंक्रिटीकरण करणे चार लाख , पिंपरी कॉंक्रिटीकरण करणे चार लाख , पठाणवस्ती कॉंक्रिट रस्ताकरणे पाच लाख , पिसेवाडी कॉंक्रिट रस्ताकरणे पाच लाख , रेडे पाणीपुरवठा करणे पाच लाख , संगम कॉंक्रिट रस्ताकरणे पाच लाख , शिंगोर्णी पुल बांधणे पाच लाख , शेंडेचिंच कॉंक्रिट रस्ताकरणे पाच लाख , तांबेवाडी रस्ताकरणे पाच लाख , तामशिदवाडी कॉंक्रिट रस्ताकरणे पाच लाख , तरंगफळ पाणीपुरवठा करणे पाच लाख , तांदुळवाडी पाणी पुरवठा व समाज मंदिर दुरुस्ती करणे पाच लाख , तांबवे गटार करणे पाच लाख , उघडेवाडी कॉंक्रिट रस्ताकरणे चार लाख , नेवरे कॉंक्रिट रस्ताकरणे पाच लाख , विजयवाडी कॉंक्रिट रस्ताकरणे पाच लाख , जाधववाडी कॉंक्रिट रस्ताकरणे पाच लाख , इस्लामपूर कॉंक्रिट रस्ता व गटार करणे दहा लाख , पिलीव कॉंक्रिट रस्ताकरणे पाच लाख , सदाशिवनगर बंदिस्त गटार करणे पाच लाख , सवतगव्हाण पाणी पुरवठा व पेव्हिंग ब्लॉक बसविणे पाच लाख ,
संग्रामनगर गटार करणे सात लाख , सुळेवाडी कॉंक्रिट रस्ताकरणे चार लाख , शिंदेवाडी कॉंक्रिट रस्ताकरणे पाच लाख , तोंडले कॉंक्रिट रस्ताकरणे पाच लाख , उंबरे वेळापूर कॉंक्रिट रस्ता व गटार करणे दहा लाख , विठ्ठलवाडी कॉंक्रिटरस्ता करणे पाच लाख , वाघोली कॉंक्रिट रस्ताकरणे पाच लाख , वाफेगाव कॉंक्रिट रस्ता व गटार करणे पाच लाख , यशवंतनगर पुल बांधणे , कॉंक्रिट रस्ता , गटार करणे ३६ लाख , मळोली पेव्हिंग ब्लॉक बसविणे पाच लाख , माळखांबी कॉंक्रिटी करण करणे पाच लाख , मिरे बंदिस्त गटार करणे पाच लाख , जांभुड कॉंक्रिट रस्ता व गटार करणे पंधरा लाख , खळवे कॉंक्रिट रस्ता , पेव्हिंग ब्लॉक बसविणे दहा लाख अशा १०१ कामासाठी ५ कोटी ६२ लाख मंजूर करण्यात आले आहेत .