Latest News

रूग्ण हक्क संहिता व दरपत्रक दवाखान्याच्या दर्शनी भागात लावण्यात यावे ; अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीची मागणी

महर्षि डिजीटल न्यूज

अकलूज : महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी नियम २०२१ द्वारे सार्वजनिक आरोग्य विभागाने अधिसुचना जारी करत रूग्ण ह्क्क रुग्णांना हक्क प्रदान केलेल्या आहेत ते रूग्ण हक्का व दवाखान्याचे दरपत्रक नागरिकांना दिसेल असे  दवाखान्याच्या प्रथम दर्शनी भागात लावण्यात यावे बंधनकारक केलेले आहे तरी अकलूज नगरपरिषद हद्दीतील सर्व दवाखान्यात या नियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी या करीता अखिल भारतीय ग्राहक पंचायत समिती अकलूजच्या वतीने अकलूज नगरपरिषदेस निवेदन देण्यात आले.

रूग्ण हक्क संहिता व दरपत्रक दवाखान्याच्या दर्शनी भागात ठळकपणे लावणे बंधनकारक आहे, जे  हाॅस्पीटल याची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्या हाॅस्पीटलचा परवाना रद्द करण्यात येईल असा आदेश जिल्हा शल्यचिकित्सक सोलापूर यांनी काढलेला आहे परंतू अकलूज शहरातील बहुतांश हाॅस्पीटल या नियमाचे पालन करत नाहीत. 

अकलूज नगरपरिषद हद्दीतील सर्व हाॅस्पीटल्सना महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी नियम २०२१ची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी नगरपरिषदने आपल्या स्तरावरून पत्रव्यवहार करावा व जे हाॅस्पीटल्स या कायद्याचे पालन करणार नाहीत त्यांचे हाॅस्पीटल्स परवाने रद्द करावे असे अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे अकलूज शहराध्यक्ष लालासाहेब अडगळे यांनी सांगितले.

नगरपरिषदेच्या वतीने उपमुख्याधिकारी एस.सी.खुळे यांनी निवेदन स्वीकारले यावेळेस ग्राहक पंचायत समितीचे संघटक अमित पुंज, भाजप तालुका सरचिटणीस सुरज म्हस्के, संतोष ऐवळे, समाधान वाघमारे, विशाल फुले,शैलेश दिवटे, स्वप्नील शहाणे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!