माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमातील मुख्यमंत्र्यांच्या पत्राचे उंबरे दहिगाव शाळेत वाचन
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : ’मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमातील विद्यार्थ्यांना उद्देशून मुख्यमंत्री यांनी लिहिलेल्या पत्राचे वाचन जि.प.प्रा. शाळा उंबरे दहिगाव केंद्र मारकडवाडी ता. माळशिरस जि. सोलापूर या शाळेत करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून दिलेल्या पत्राचे वाचन शाळेतील विषय शिक्षक प्रकाश कांबळे यांनी केले.
प्रारंभी मुख्याध्यापक दिगंबर शेळके यांनी राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमातील शाळांतील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे. यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ’मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्यात येत आहे याची माहिती व मुख्यमंत्र्यांच्या विद्यार्थ्यांकडून असणार्या अपेक्षा व शासनाने विद्यार्थ्यांसाठी, शाळांसाठी राबविलेल्या योजनांची माहिती दिली.
या पत्र वाचनानंतर विद्यार्थ्यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्या असणार्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले व या उपक्रमात शाळा सहभागी होत असल्याचे मुख्याध्यापक दिगंबर शेळके यांनी स्पष्ट केले.
या पत्र वाचनावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच जावेद होनवाड, भैरवनाथ आदलिंगे, नवनाथ सुरवसे, विजया बदे व अजय साळवे हे शिक्षक उपस्थित होते.