सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विशेष साहित्य पुरस्कार इंद्रजित भालेराव यांना तर डॉ. सुवर्णलता नाईक निंबाळकर यांना साहित्य पुरस्कार प्रदान
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : साहित्य क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा यंदाचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विशेष साहित्य पुरस्कार प्रा.इंद्रजित भालेराव यांना तर साहित्य पुरस्कार डॉ सुवर्णलता नाईक निंबाळकर यांना देण्यात आला .
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून जेष्ठ साहित्यीक व साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराचे वितरण करण्यात आले .
श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्ट, शंकरनगर-अकलूज यांचे वतीने सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील साहित्य पुरस्कार 2024 वितरण सोहळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, आ रणजितसिंह मोहिते पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, शीतलदेवी मोहिते पाटील, स्वरुपाराणी मोहिते पाटील, आदींच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.
आपल्या सिध्दहस्त लेखणीने सामाजीक, वैचारीक, सांस्कृतीक कथा कविता ललित, ऐतिहासीक, चरित्र, आत्मचरित्र इ. साहित्य प्रकारामध्ये अमुलाग्र योगदान देऊन समाज प्रबोधन करणा-या साहित्यीकांचा सन्मान करणेकरीता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील,आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्ट, शंकरनगर-अकलूज यांचे वतीने सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील साहित्य पुरस्कार-2023 पासून वितरण सोहळा चालू केला असलेबाबतची माहिती सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील साहित्य पुरस्कार कमिटीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी प्रास्ताविकात दिली.
सहकार महर्षि शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखाना प्रशासकीय कार्यालयातील उदय सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमास जिल्ह्यातील साहित्य प्रेमी उपस्थित होते . उपस्थित राहायचे आभार ट्रस्टचे सचिव अभयसिंह माने देशमुख यांनी मानले
पुरस्कार वितरणानंतर विशेष साहित्य पुरस्कार प्राप्त इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या खुमासदार शैलीत भाषण करून श्रोत्यांना मंत्र मुग्ध केले त्यांनी दोन-तीन कविता सादर केल्या त्यातून त्यांचे जीवन चरित्र उभे राहिले तर साहित्य पुरस्कार प्राप्त डॉ. सुवर्णलता नाईक निंबाळकर यांनी आपण अकरावी नापास असलेल्या विद्यार्थिनी परंतु पतीच्या प्रेरणेने पुढे शिक्षण पूर्ण करत इतिहासातील कर्तुत्वान महिलांचा इतिहास रसिकांसमोर मांडला हा पुरस्कार म्हणजे माझा माहेरचा पुरस्कार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या भाषणात खरोखरच वाचन शैली दुरावत चालली आहे काय ? याविषयी सविस्तर विचार मांडताना वाचक आहेत म्हणूनच लेखक आहेत हे नमूद करत अशा प्रकारच्या साहित्य पुरस्काराने साहित्यिकांची प्रेरणा वाढते असेही नमूद केले आपण प्रशासकीय सेवेत असताना मंत्रिमंडळातील दोन देखणे नेतृत्व पहावयास मिळाले एक म्हणजे स्वर्गीय विलासराव देशमुख आणि विजयसिंह मोहिते पाटील विजय दादांबद्दल अधिक सांगताना ते म्हणाले प्रशासकीय अधिकार्यांना कसे वागवावे हे राजकारण्यांनी विजयदादांकडून शिकावे