रोटरी क्लब अकलूजच्या अध्यक्षपदी प्रिया नागणे तर सचिव पदी मनीष गायकवाड

महर्षि डिजीटल न्युज
अकलूज: अकलूज (ता.माळशिरस) येथील रोटरी क्लब अकलूजच्या सन २०२४-२५ च्या वर्षासाठी अध्यक्ष म्हणून प्रिया नागणे व सचिव पदी मनीष गायकवाड यांची निवड सहाय्यक प्रांतपाल अतुल चव्हाण यांनी जाहीर करण्यात आले.
रोटरी क्लब अकलूजची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक २९ डिसेंबर रोजी अकलूज येथे पार पडली त्यावेळेस पुढील वर्षाचे अध्यक्ष सचिव व संचालक मंडळ यांची निवड करण्यात आली. २०२५-२६ च्या वर्षासाठी केतन बोरावके यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
रोटरी क्लब अकलूजच्या स्थापनेपासूनच प्रथमच महिला अध्यक्षचा मान प्रिया नागणे यांना मिळालेला आहे. प्रिया नागणे यांनी त्यांच्या अध्यक्षपदाखाली संचालक मंडळ निवड करण्यात आली त्यामध्ये उपाध्यक्षपदी नवनाथ नागणे, सहसचिव सचिन गुळवे, खजिनदार शशील गांधी, महादेव मगर, कमलेश शहा, ओजेस दोभाडा, बबनराव शेंडगे, दीपक फडे, अजित वीर, डॉ. बाहुबली दोशी, आशिष गांधी, स्वप्निल शहा, तृप्ती कुदळे, नितीन कुदळे, संदीप साळुंखे, संदीप लोणकर, स्वराज्य फडे, विरेन गांधी, कल्पेश पांढरे, गोमटेश दोशी, रुजल दोभाडा, हनुमंत सुरवसे, अभिजीत गांधी, यांची संचालक पदी निवड करण्यात आली आहे त्यावेळेस रोटरी क्लब अकलूजचे सर्व सदस्य उपस्थित होते प्रिया नागणे अध्यक्षपदाच्या भाषणामध्ये सांगितले रोटरी क्लबच्या माध्यमातून समाज उपयोगी कामे करणार आहे.