Latest News

चिकन ताट देण्यास उशीर झाला म्हणून ताणले गावठी पिस्तूल ; अकलूज मधील हॉटेलात थरार, गुन्हा दाखल

महर्षि डिजीटल न्यूज

अकलूज : वेळापूर येथील गावठी पिस्तूल सापडण्याचे प्रकरण ताजे असतानाच अकलूज मधील एका हॉटेलात गावठी पिस्तूल दाखवण्याचा थरार पहावयास मिळाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याप्रकरणी अकलूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे.

याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील गुपचूप हॉटेल येथे काल दिनांक २९ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता शंकर खंदारे हा त्याचा मित्र करण भोसले असे दोघेजण सोबत आले होते. ते एका टेबलला बसून दोन चिकन थाळीची ऑर्डर दिली होती त्यावेळी हॉटेलमध्ये गर्दी असल्याने त्यांची चिकन थाळी येण्याकरीता वेळ लागल्याने त्यांनी शिवी देत तुम्ही हॉटेल चालवता का काय करता? आमची ऑर्डर लवकर आणा असे म्हणून मोठ मोठयाने शिवीगाळ करून, कालवा करू लागले. जावून त्यांना हॉटेलमध्ये आज गर्दी असल्याने थोडा वेळ लागेल जर तुम्हाला खूपच गडबड असेल तर तुम्ही दुसरीकडे जावा विनाकारण कामगारांना शिवीगाळ करू नका इतर गि-हाईकांना त्रास होतोय असे समजावून सांगितले.

परंतु शंकर खंदारे याने ‘तुम्हाला माहीत नाही मी कोण आहे, मी काय करू शकतो तुमच्याकडे बघतोच’ अशी दमदाटी करून तेथून त्याचे मित्रासह निघून गेला. त्यानंतर सुमारे 10 मिनटात परत शंकर खंदारे व करण भोसले असे दोघे परमिट रूम मध्ये आले त्यावेळी सुमारे 10/30 वा. ची वेळ होती. ते परत हॉटेल मालक म्हणून मला व वेटर लोकांना तुमच्याकडे बघतो म्हणून दमदाटी करू लागलेवर परत मी त्यांना समजावून सांगून परत पाठवून दिले. त्यानंतर पुन्हा 10 मिनटाने तिस-या वेळी शंकर खंदारे हा हॉटेल/परमिट रूम मध्ये मोटार सायकलवर फास्ट आला व त्याने त्याची गाडी पार्कींगमध्ये उभा करून तो खाली उतरून मी किचनकडे असताना तो माझेकडे त्याचे हात पाठीमागे धरून आला व शिव्या देवू लागला. त्यामुळे मॅनेजर मनोज घाडगे हा पण तेथे आला व त्याने सोबत आणलेले गावठी पिस्टल मला दाखविले. त्यावेळी मॅनेजर मनोज घाडगे याने पाठीमागून मिठी मारली त्याला धरले व त्याचे हातात असलेली गावठी पिस्टल काढून घेवून कामगार विनोद काटे याचे हातात दिली. त्यावेळी तो मनोज याला हिसके देवून सुटायचा प्रयत्न करीत असताना तो पाण्याच्या टाकीला अडखळून खाली पडला, त्यानंतर हॉटेल मालकांनी पोलीसांना कळविलेनंतर पोलीसांनी मिळून शंकर सुधाकर खंदारे रा.महर्शी कॉलनी, अकलुज ता.माळशिरस यास पोलीस स्टेशनला आणले तेव्हा पोलीसांना गावठी पिस्टल दाखविले व पोलीसांनी पाहणी केली असता, 10,000/रु:- एक जुनाट गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तुल (रिव्हॉल्वर) त्याचे खालचे बाजूस मॅगझीन असून ती बाहेर काढून पाहता बटहोल्डचे दोन्ही बाजूस चॉकलेटी रंगाचे फायबर असलेले जप्त केले आहे.

याबाबत हॉटेल चे चालक काकासाहेब जगदाळे यांनी अकलूज पोलिसात फिर्याद दिली असून आरोपीवर 914/2023 भा.द.वि.सं.क. 504,506, षस्त्र अधिनियम 3,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पीएसआय बबन साळुंखे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!