महाराष्ट्र

अकलूजच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार ; टेंडर प्रक्रियेतील ‘परसेंटेज ऑफ बीओक्यू’ चुकवले

बिलो टक्केवारीच्या रकाण्यात वाढीव रकमा – फेर निविदा घ्या अथवा वाढीव रकमेप्रमाणे वर्क ऑर्डर द्या – ठेकेदारांची मागणी

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून टेंडर म्हणजे निविदा प्रक्रियेमध्ये महत्वाचा भाग असलेल्या ‘परसेंटेज ऑफ बीओक्यू’चा रकाणा चुकल्यामुळे बिलो टक्केवारीच्या रक्कमेत मोठी तफावत दिसून येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीतील ‘परसेंटेज ऑफ बीओक्यू’ च्या रकाण्यात येणार्‍या रक्कमेप्रमाणे वर्ड ऑर्डर द्या अथवा फेर निविदा घ्या अशी मागणी ठेकेदारांकडून होऊ लागली आहे.

याबाबत महर्षि डिजीटल न्यूज ला मिळालेल्या एक्सक्‍लुझीव्ह माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सोलापूर जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार अभियंत्यासाठी ई-निविदा सूचना क्रमांक 07 व इतरांसाठी ई-निविदा सूचना क्रमांक 08 या निविदाचे ऑनलाईन तसेच विविध वृत्तपत्रांतून प्रसिध्दीकरण केले होते. सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूजच्या अंतर्गत येणार्‍या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या निविदी सूचना क्रमांक 07 मध्ये 20 कामे तर निविदा सुचना क्रमांक 08 मध्ये 27 कामांचा समावेश आहे. या दोन्ही निविदा भरण्याची मुदत सध्या संपली असून त्या उघडून वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

यामध्ये कळीचा मुद्दा म्हणजे या दोन्ही निविदा प्रक्रियेत प्रचंड गोंधळ झाला असून यामध्ये महत्वाचा भाग असलेल्या ‘परसेंटेज ऑफ बीओक्यू’ (बील ऑफ क्वांटीटी) अर्थात ज्या कामाचे टेंडर भरले जात आहे त्या कामासाठी वापरण्यात येणार्‍या प्रमाणांचे मुल्यांकन व त्याची टक्केवारी. यामध्ये टेंडर भरणारा ठेकेदार आपल्याला काम मिळावे म्हणूजन अंदाजपत्रकीय रक्कमेच्या खाली टक्केवारी टाकून टेंडर भरत असतो. परंतु ऑनलाई प्रकियेतील या रकाण्यात झालेल्या चुकीमुळे ‘परसेंटेज ऑफ बीओक्यू’ च्या रकाण्यात शुन्य टक्केवारी टाकली तरी अंदाजपत्रकीय रक्कमेच्या जास्त रक्कम दर्शवली जात आहे.

वास्तविक अंदाजपत्रकीय रक्कमेपेक्षा ज्या ठेकेदाराची कमीत कमी किंमत भरली गेलेली असते त्याला सदरचे काम अथवा त्याची वर्क ऑर्डर दिली जाते. परंतु या निविदा प्रक्रियेत बीओक्यू चुकल्यामुळे अंदाजपत्रकीय रक्कमेपेक्षा कमी रक्कम दर्शविण्याऐवजी अधिकची रक्कम दर्शवली जात असल्याने गोंधळ निर्माण झाला असून संबंधित अधिकार्‍यांनी निविदा प्रक्रियेत दर्शवणार्‍या वाढीव रकमेप्रमाणे वर्क ऑर्डर द्यावी अथवा सदरची निवीदा प्रक्रिया रद्द करून फेर निवीदा घ्यावी अशी मागणी होऊ लागली आहे. (क्रमश:)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!