लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा बुरुड समाजाची मोडनिंब येथे बैठक संपन्न
महर्षि डिजीटल न्यूज
टेंभुर्णी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा बुरुड समाजाची बैठक रविवार दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी मोडनिंब ता.माढा जिल्हा सोलापूर श्री प्रल्हाद विष्णू साळुंखे यांच्या निवासस्थानी अत्यंत खेळमेळेच्या वातावरणात संपन्न झाली.
बैठकीची सुरुवात दशरथ वडतिले यांनी सूत्रसंचालन करून केली. माढा तालुका बुरुड समाजाचे ज्येष्ठ समाज बांधव सदाशिव मोरे यांनी जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांचे माढा तालुका बुरुड समाजाच्या वतीने स्वागत केले. व महिलांच्या हस्ते समाजाचे धर्मगुरू श्री कैत्तया स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
जिल्ह्यातील ज्येष्ठ समाज बांधव म्हणून राजेंद्र सूर्यवंशी, पोपट सूर्यवंशी, सदाशिव मोरे, लक्ष्मण साळुंखे, नारायण साळुंखे, दीपक सूर्यवंशी उपस्थित होते. ज्येष्ठ समाज बांधवांचा सत्कार समस्त माढा बुरुड समाज यांच्यावतीने करण्यात आला. ज्येष्ठ समाज बांधव यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा बुरुड समाज निवडणूक प्रक्रिया २०२४ चे १२ सदस्यांची कोअर कमिटी स्थापन करून कोअर कमिटी सदस्यांचे ज्येष्ठांच्या हस्ते सत्कार करून नियुक्तीपत्र देण्यात आले.
तसेच कोअर कमिटी स्थापन झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील ज्या ज्या तालुक्यांनी जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली जिल्हा प्रतिनिधी म्हणून २१ सदस्यांचा कोअर कमिटी सदस्यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविकात महेश सूर्यवंशी यांनी पहिल्या मीटिंग पासून आजच्या मीटिंग पर्यंत सगळा आढावा जिल्ह्यातील सर्व समाज बांधवासमोर मांडला. मीटिंगमध्ये असे निर्णय घेण्यात आले होते की आपल्या सोलापूरचे जिल्हा बांधणी करत असताना महाराष्ट्रातील कोणत्याही गटाची ही जिल्हा बांधणी नसली पाहिजे त्याप्रमाणेच हेच धोरण ठरवून पुढे आम्ही चालत गेलो व त्या मीटिंगमध्ये प्रथमता कोअर कमिटी स्थापन करण्यात यावे हे सांगण्यात आले.
यावेळी कोअर कमिटी सदस्य म्हणून १) पंडित नारायण वडतिले, २) सूर्यकांत अंबादास शेंद्रे, ३) अरुण शिवशंकर साळुंखे, सोलापूर ४) विजय दगडूशेठ सुरवसे पंढरपूर, ५) संतोष जगन्नाथ सावंत बार्शी, ६) श्रीकांत लक्ष्मण सूर्यवंशी माळशिरस, ७) सुभाष शंकरराव सूर्यवंशी अक्कलकोट, ८) सदाशिव बलभीम मोरे माढा, ९) दीपक पांडुरंग सुपेकर करमाळा, १०) सचिन सुरेश वडतिले मंगळवेढा, ११) रामेश्वर ज्ञानेश्वर सुपेकर मोहोळ,१२) नागेश सिद्राम सुरवसे सांगोला असे १२ कोअर कमिटी सदस्य नेमण्यात आलेले आहेत