Latest News

पोलिसांच्या बँड पथकाने वेधले लक्ष ; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अकलूज पोलिसांचा उपक्रम

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविले जात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अंतर्गत अकलूज येथील महर्षि चौकातील धनलक्ष्मी ज्वेलर्स समोर पोलिसांच्या बँड पथकाच्या देशभक्‍तीपर गितांच्या सादरीकरणाने सर्वांचेच लक्ष वेधले. अकलूज पोलिस ठाण्याच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अकलूजच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सई भोरे पाटील, पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड, एपीआय गणेश चौधरी, पीएसआय महाडिक मॅडम, बबन साळुंखे, हवालदार सुहास क्षिरसागर, विकी घाडगे, लक्ष्मण पिंगळेकिशोर गायकवाड, प्रविण हिंगणगावकर, नितीन लोखंडे, सिध्दू कंठळी, धनलक्ष्मी ज्वेलर्सचे बाबूशेठ चव्हाण यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.

देशभक्तीने ओतप्रोत असलेल वंदे मातरम्, ऐ मेरे वतन के लोगो, दिल दिया है जान भी देंगे, जय जय महाराष्ट्र माझा आदी देशभक्‍तीपर गितांचे अभूतपुर्व सादरीकरण करत बँड पथकाचे प्रमुख कांबळे यांच्या नेतृत्वाखाली बँड पथकाने देशप्रेमाची चेतना जागवली. आकर्षक ड्रेस कोड, शिस्तबध्द व संगितबध्द सादरीकरणाने अकलूजकरांचे पाय आपोआप स्थिरावले. या बँड पथकात वंशी (बासरी), शंख (बिगूल), आनक (साइड ड्रम), पणव (बेस ड्रम), झांज (झिल्लरी), त्रिभूज (ट्रँगल) आदी वाद्यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!