महाराष्ट्र

खंडकरी शेतकर्‍यांच्या नावावर होणार जमीन ; आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, खंडकरी शेतकर्‍यांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : भोगवटा वर्ग 2 वरून भोगवटा 1 करण्याबाबत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला त्यामुळे खंडकरी शेतकर्‍यांना जमिनीचा मालकी हक्क प्राप्त होणार आहे असून आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी खंडकरी शेतकर्‍यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.

शेती महामंडळाकडुन मुळ खंडकर्‍यांना जमीनी देताना भोगवटादार वर्ग-2 म्हणून स्व-कसवणुकीसाठी वाटप करण्यात आलेल्या आहेत. 10 वर्षानंतर या जमीनींचे वर्ग 1 मध्ये रुपांतर करण्यात येईल असे सांगितले होते.परंतु अजुनही मुळ खंडकर्‍यांच्या जमीनी वर्ग 1 झालेल्या नव्हत्या. त्यामुळे मुळ खंडकर्‍यांना जमीनीची खरेदी विक्री,कौटुंबिक हक्क,कर्ज या कामी विनियोग होत नव्हता त्यादृष्टीने अभिलेख आणि नोंदवहीत भोगवटदार वर्ग 2 रद्द करुन वर्ग म्हणुन तातडीने नोंद करण्याची तरतुद करण्यात यावी म्हणून आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करत खंडकरी शेतकर्‍यांना न्याय देण्याची मागणी केली होती.तशा आशयाचे पत्र ही त्यांनी संबधित विभागाला दिले होते.

शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्यातील खंडकरी शेतकर्‍यांना शासनाने दिलेल्या जमिनी लवकरच त्यांच्या नावावर होणार आहेत. आता खंडकरी शेतकरी कसत असलेल्या या जमिनीचा प्रकार बदलणार आहे. भोगवटा 2 मधुन भोगवटा 1 मध्ये रुपांतरीत होणार आहेत त्यामुळे खंडकरी शेतकरी जमिनीचा कब्जेदार होणार असुन त्याला ही जमिन विकण्याचा पर्ण अधिकार तसेच जमिनी विक्री,हस्तांतरण करण्यासाठी शासनाच्या परवानगीची गरज असणार नाही.

आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी वेळोवेळी यासंबधी मागणी केली होती.त्याची दखल घेवुन महसूल विभागाने भोगावटा 2 वरून भोगावटा 1 करण्याचा प्रस्ताव तयार केला होता.तो प्रस्ताव आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मंजुर झाला असुन खंडकरी शेतकर्‍यांचा प्रलंबित प्रश्न निकालात निघाला आहे.आता राज्यातील खंडकरी शेतकरी हक्काच्या जमिनीचे मालक होणार आहेत. याचा लाभ राज्यातील सुमारे चार हजार शेतकर्‍यांना होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील खंडकरी शेतकर्‍यांनी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!