गणेश विसर्जनाबाबत अकलूज नगरपरिषदेची महत्त्वाची सूचना ; मुख्याधिकारी गोरे यांनी केले आवाहन

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : अकलूज परिसरातील गणपती विसर्जनाबाबत अनेक चर्चा व संभ्रम निर्माण होत असतानाच अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी याबाबत स्पष्टीकरण देत गणेश विसर्जन करणाऱ्यांना आवाहन केले आहे.
दयानंद गोरे म्हणाले, अकलूज नगरपरिषद वतीने सर्व अकलूज परिसरातील नागरीकांना सुचित करण्यात येते की, निरा नदीमध्ये पुरेसे पाणी आल्याने गणेश विसर्जनाकरीता निरा नदीतच सुविधा निर्माण झालेली आहे. हि बाब विचारात घेता नगरपरिषदेने घरोघरीं जाऊन मूर्ती संकलन करण्याचे व एकत्रीत करून इतर पाणी उपलब्ध असल्याचे ठिकाणी विसर्जन करण्याची प्रक्रिया रद्द केली आहे.
त्यामुळे सर्व नागरिकांनी याची नोंद घेऊन आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन अकलूज नगरपरिषद परिसरातील घाटावरच करावे. विसर्जन करताना सदरील मूर्तींचे विधीवत पूजन करून नगरपरिषद कर्मचारी यांच्या ताब्यात द्यावी. कोणीही नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये. असे आवाहन अकलूज नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले आहे.



