एस टी स्टँड वर चोरी करणारी सराईत महिला गुन्हेगार मोहोळमध्ये जेरबंद ; 3,46,700/- रुपयेचे सोन्याचे दागिने हस्तगत
महर्षि डिजीटल न्यूज
सोलापूर : सोलापूर ग्रामीण जिल्हयातील विविध एस.टी स्टँड येथे महिलांचे दागिने चोरीस गेले होते त्याबाबत विविध पोलीस ठाणे येथे चोरी गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सदर गुन्ह्यांची गांर्भीयाने दखल घेवुन नमुद गुन्हे उघडकीस आणणे बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुरेश निंबाकर स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांना सुचना दिल्या होत्या.
सदर सुचने प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुरेश निंबाळकर यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सहा.पोलीस निरीक्षक, धनंजय पोरे व त्यांचे पथकास आदेशीत केले होते. त्याप्रमाणे सदर पथकाने सोलापूर ग्रामीण जिल्हयातील विविध एस टी स्टँड वर चोरी झालेले घटनास्थळी भेट देवुन संशयीत आरोपी यांची माहिती प्राप्त केली.
सदर आरोपीत यांची माहिती घेत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मोहोळ एस टी स्टँड येथे चोरी करणारी महिला आरोपी नई जिंदगी, सोलापूर शहर येथे येणार आहे. सदर पथकाने तात्काळ नई जिंदगी, सोलापूर येथे जावुन नमुद महिला आरोपीस ताब्यात घेतले. सदर महिला आरोपीने सुरवातीला उडवा उडवीचे उत्तरे दिली. पंरतु तिच्याकडे केलेल्या सखोल तपासात तीने मे-2023 मध्ये मोहोळ एस टी स्टँड येथे बसमध्ये चढताना एका महिलेचे मंगळसुत्र चोरी केल्याचे कबुल केले.
तिच्याकडे केलेल्या कौशल्यपुर्ण तपासामुळे सदर महिला आरोपी हिने सोलापूर ग्रामीण जिल्हयातील खालील पोलीस ठाणे येथे दाखल असलेले गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
अ.क्रं पोलीस ठाणे गुरंन व कलम गेला माला मिळाला माल
1 मोहोळ 395/2023 भादंवि क. 379 70000
2 बार्शी शहर 260/2023 भादंवि क. 379 54000
3 बार्शी शहर 527/2023 भादंवि क. 379 39900
4 पंढरपूर शहर 360/2023 भादंवि क. 379 30000
5 टेंभुर्णी 52/2023 भादंवि क. 379 32500
6 अकलुज 459/2023 भादंवि क. 379 60000
7 अक्कलककोट उत्तर 239/2023 भादंवि क. 379 45000
8 कुर्डुवाडी 456/2022 भादंवि क. 379 15250
नमुद महिला आरोपीकडे केलेल्या कौशल्यपुर्ण तपासामुळे तिच्याकडुन रुपये 3,46,700/- किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. सदर महिला आरोपीस मोहोळ पोलीस ठाणे गुरंन 395/2023 भांदवि क. 379 या गुन्हयात दिनांक 09/07/2023 रोजी अटक करण्यात आली असुन सध्या सदर महिला आरोपी मोहोळ पोलीस ठाणेच्या पोलीस कोठडीत आहे.
सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक, शिरीष सरदेशपांडे, व अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुरेश निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांचे नेत्तृत्वाखाली सहा.पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, श्रेणी पोसई राजेश गायकवाड, सपोफौ श्रीकांत गायकवाड, निलकंठ जाधवर, पोहेकॉ सलीम बागवान, हरिदास पांढरे, आबासाहेब मुंढे, विजय भरले, सुहास नारायणकर, मपोहेकॉ मोहीनी भोगे, पोना रवी माने, मपोना पल्लवी इंगळे, ज्योती काळे, पोकॉ समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, चापोशि दिलीप थोरात, यांनी केली आहे.