नोकरी सोडत नाही म्हणून राग गेला विकोपाला ; म्हणून पत्नीचा गळा चिरला
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : माणसाचा राग विकोपाला जाण्याची काही मर्यादा राहिली नाही असे चित्र अनेकदा पाहायला मिळते रागाच्या भरात माणूस कोणत्या टोकाला जाईल याची शाशती सांगता येत नाही. त्यामुळे याच रागातून मारामारी कोण अशा घटना घडल्या जातात. गेल्या आठ ते दहा दिवसातील अकलूज परिसरात खून होण्याची दुसरी घटना काल दुपारच्या सुमारास घडली.
याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार व मैनुद्दीन कासम शेख वय 55 वर्ष व्यवसाय टू व्हिलर गॅरेज, रा. चिंचोलीरोड, सांगोला ता.सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादी प्रमाणे, दिनांक 14/04/2024 रोजी दुपारी 3.30 वा. चे सुमारास माझी मुलगी आफ्रिन फिरोज काझी वय 37 वर्षे रा. गुरुनगर, काझीगल्ली, अकलूज ता. माळशिरस हिला व नात जिया हिला मोटार सायकलवरुन अकलुज वेळापूर रोडने संजयनगर, माळेवाडी येथे आलेनंतर, तिचा नवरा व माझा जावई जावई फिरोज हुकमुद्दीन काझी वय 45 वर्षे रा. गुरुनगर, काझीगल्ली, अकलूज याने ” तु सांगोला येथे राहू नको, तेथील नोकरी सोडून दे, तु अकलुजला रहायला ये” असे म्हणून भांडण काढले. यावर माझ्या मुलीने सांगोला येथील नोकरी सोडून अकलुजला येणार नाही असे म्हणाल्याचे कारणावरुन चिडून जावून, तुला आता जिवंत सोडत नाही असे म्हणून चाकूने तिच्या गळयावर भोकसून तिचा खुन केला आहे व त्यानंतर त्याने त्याचे घरी येवून गळफास घेण्याचा प्रयत्न केला असून त्याचेवर अकलाई हॉस्पीटल अकलुज येथे उपचार चालू आहेत.
याबाबत अकलूज पोलिसात अकलुज पोलीस ठाणे गु.र.नं. 197/2024 भा.द.वि.सं.क. 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई डी. टी.शिंदे अधिक तपास करीत आहेत.