अकलूज मध्ये खून… ऐन निवडणुकांच्या तोंडावर घडलेल्या घटनेने खळबळ ; सहा जणांना अटक, दोन बालकांचा समावेश
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच काल रात्री अकलूज मध्ये झालेल्या मर्डरमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणातील ६ आरोपींना अकलूज पोलिसांनी अटक केली असून दोघे विधीसंघर्ष बालक असल्याने त्यांना समज पत्र देण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अकलूज राऊत नगर येथे पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून व प्रियांका गायकवाड हिला तू माझे नाव हरिदास वाघमोडे यास का सांगितले असा जब विचारलेच्या कारणावरून ८ जणांनी मिळून धारदार शस्त्राने विक्रम जगदिश चौगुले वय ३५ वर्षे याचा खून केल्याच्या घटनेने अकलूज परिसरात खळबळ उडाली आहे.
अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मौजे राऊतनगर, अकलूज ता. माळशिरस येथे राहणारा विक्रम जगदीश चैगुले वय 35 वर्षे हा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करत होता. फेबुवारी 2024 मध्ये हरीदास वाघमोडे याचे टॅक्टरला त्याचे रिक्षाचा कट लागल्याने कारणावरुन त्यांचे भांडण झाले होते. त्यावेळी विक्रम चैगुले याने हरीदास वाघमोडे यास मारहाण केली होती त्यामुळे हरीदास वाघमोडे याने विक्रम चैगुले याचेविरुध्द अकलूज पोलीस ठाणेस तक्रार दिली असून गुन्हा दाखल झाला होता व त्याबाबत पोलीसांकडून कारवाई झाली आहे.
हरीदास वाघमोडे यास विक्रम चैगुले याचे नांव माहिती नव्हते परंतु त्याचे नांव हरीदास वाघमोडे यास, प्रियंका अनिल गायकवाड हिने सांगितले आहे असा रोश विक्रम चैगुले याचे मनात होता. विक्रम चैगुले याने काल रोजी सायंकाळी 4.00 वा. चे सुमारास प्रियंका गायकवाड हिला, तु माझे नांव हरीदास वाघमोडे यास का सांगितले या कारणावरुन शिवीगाळ केली होती. त्यानंतर रात्री 9.00 वा. चे सुमारास विक्रम चैगुले हा त्याचे मुलीसह बहिणीचे घरी जावून तो जेवन करत असताना बहिण सौ. स्वाती अनिल चव्हाण हिचे घरासमोर आरोपी कु-हाड, कोयता, काठयासह येवून कोठे आहे विक्रम, त्याला आता सोडत नाही, तुला खलास करतो, काय समजतोस’’ असे म्हणून घरात घुसण्याचा प्रयत्न करु लागले तेव्हा त्याची बहिण, मुलगी व भाची यांनी त्यांना घरात येण्यास मज्जाव करुन दार लावून आडवण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपींनी त्यांना ढकलून धक्काबुक्की करुन दरवाजा उघडून घरात प्रवेश करुन जेवन करत असलेल्या विक्रम चैगुले यास, तुला खलास करतो असे म्हणून कु-हाड, कोयता, काठयांनी डोकीत मारहाण केली तेव्हा त्याची बहिण, मुलगी, भाची यांना आरडाओरड केला तेव्हा विक्रम चैगुले याचा मेव्हुणा, बहिणीचा दिर, शेजारी राहणारा ईश्वर भोसले हे पळत आलेनंतर मारहाण करणारे लोक दमदाटी करुन निघून गेले त्यावेळी विक्रम चैगुले हा गंभीर जखमी झाल्याने त्यास नातेवाईकांनी उपचारासाठी अकलाई हाॅस्पीटल येथे दाखल केले परंतु डाॅक्टरांनी तो उपचारापुर्वीच मयत झाला असल्याचे घोशीत केले.
सदर घटनेची माहिती अकलूज पोलीसांना मिळताच लागलीच अकलुज पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, पोसई सुधीर खारगे, पोसई दिलीप शिंदे, पोसई बबन साळुंके, डी.बी. पथकातील श्रीकांत निकम, सुहास क्षिरसागर, विक्रम घाटगे, शिवकुमार मदभावी, सोमनाथ माने, प्रविण हिंगणगावकर तसेच अकलुज शहर चौकीचे पोलीस अंमलदार दिलीप जाधव, विशाल घाटगे, विशाल पोरे, प्रविण काळे, अमोल पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेबाबत विक्रम चैगुले याची बहिण सौ. स्वाती अनिल चव्हाण यांनी अकलूज पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने भा.द.वि.सं.क. 302, 143, 147, 148, 149, 452, 323, 506, 427, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेकरीता गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार व पोलीस अधिकारी यांनी रात्रीच शोध घेवून आरोपी १) अभिजीत संजय भोसले, २) अमित अनिल गायकवाड, ३) अदित्य गोपीनाथ भोसले, ४) संजय शंकर भोसले, ५) अमित गोपीनाथ भोसले, ६) बापू तोंडसे, ७) रवि किर्ते, ८) सनि किर्ते सर्व रा. जुना सराटीरोड, राऊतनगर, अकलूज ता. माळशिरस यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक शिरीश सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.