पूर्णपणे मोफत सर्व जातीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणी करण्याचे बजरंग भोसले यांचे आवाहन
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : शिवरत्न उद्योग समूहाचे चेअरमन कीर्तीध्वजसिंह मोहिते पाटील व अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिव कीर्ती युवा मंचच्या वतीने श्रीपुर महळूंग येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्व जातीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून गरजूंनी तात्काळ नाव नोंदणी करण्याचे आवाहन आयोजक बजरंग भोसले यांनी केले आहे.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांना दिलासा देण्यासाठी पूर्णपणे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विवाहासाठी येणारा आर्थिक बोजा कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
सदर विवाह सोहळ्यासाठी बजरंग भोसले यांनी इच्छुक वधू-वरांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे वधू-वरांसाठी सर्व सोयीसुविधा, लग्नाचे साहित्य, जेवण आणि धार्मिक विधी पूर्णपणे मोफत पुरवण्यात येणार आहेत.
बजरंग भोसले यांनी समाजातील प्रत्येक घटकाला या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या मोफत विवाह सोहळ्यामुळे गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे तिसरे वर्ष आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणी साठी बजरंग भोसले +91 97301 10493, सागर यादव +91 99757 39228, अक्षय भगत +91 95458 00009 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.