अकलूज पोलीसांचा ‘सुपरफास्ट तपास’ ; पथकाचा पोलिस अधीक्षक यांच्याकडून गौरव

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : अकलूज पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने गंभीर गुन्ह्यात केलेल्या जलद आणि यशस्वी तपासाबद्दल सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून विशेष सत्कार करण्यात आला. अकलूज पो.ठा. गु.र.नं. ७२५/२५ अंतर्गत कलम १०३(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३८५ आदी गंभीर आरोप नोंद असलेल्या प्रकरणाचा तपास अत्यंत कमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल पथकाचे कौतुक करण्यात आले.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार समीर पठाण, पोलीस हवालदार अमोल बकाल आणि पोलीस कॉन्स्टेबल रंजीत जगताप यांना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
तपासातील उत्कृष्ट कौशल्य, गुप्त माहिती गोळा करण्यातील प्राविण्य आणि कर्तव्यनिष्ठा लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस दलाला या अधिकाऱ्यांचा अभिमान असल्याचे मत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. भविष्यातही अशीच गुणवत्तापूर्ण सेवा देऊन महाराष्ट्र पोलीस दलाच्या उज्ज्वल परंपरेत भर घालाल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कर्मचाऱ्यांच्या आदर्शवत तपासामुळे अकलूज पोलीस ठाण्याची प्रतिमा अधिक उंचावल्याचेही पोलीस दलाच्या वतीने सांगण्यात आले.



