पराग गायकवाड यांनी केले एक हजार वह्यांचे वाटप ; शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : “पराग गायकवाड हे सामाजिक जबाबदारी स्वीकारणारे तरुण नेतृत्व आहेत. त्यांनी आज विद्यार्थ्यांच्या हितासाठी जो विधायक उपक्रम हाती घेतला, तो खरंच प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे,” अशा शब्दांत माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी पराग गायकवाड यांच्या समाजाभिमुख कार्याचे विशेष कौतुक केले.
माढा लोकसभा मतदारसंघाचे खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूजमधील जिल्हा परिषद शाळांतील 1000 विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. रमामाता तरुण मंडळ अकलूज व विजयसिंह मोहिते पाटील नर्सिंग कॉलेजचे चेअरमन पराग गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमात शिवतेजसिंह मोहिते पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना शिवतेजसिंह मोहिते पाटील म्हणाले,
“पराग गायकवाड यांनी या उपक्रमातून समाजाशी असलेली नाळ जपली आहे. शिक्षणासाठी मदत करणे म्हणजे फक्त वह्या वाटणे नाही, तर भविष्यातील पिढ्यांना सक्षम करण्याचे काम आहे. अशा कार्यकर्त्यांमुळेच मोहिते पाटील कुटुंबाची सामाजिक मूल्यं पुढे जात आहेत.”
ते पुढे म्हणाले, “अकलूजमधील तरुणांनीही पराग गायकवाड यांच्याकडून प्रेरणा घ्यावी. सामाजिक जाणिवेची ही चळवळ अशीच बळकट होण्यासाठी एकत्र काम करायला हवे.”
कार्यक्रमात यावेळी कार्यक्रमाचे आयोजक चेअरमन पराग गायकवाड, माजी ग्रामपंचायत सरपंच विठ्ठल नाना गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल(बंटी) जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष सामाजिक न्याय विभागाचे प्रा. नरेंद्र भोसले,माजी ग्रामपंचायत सदस्य,माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल उर्फ बंटी जगताप, शंकर गायकवाड,माजी ग्रामपंचायत सदस्य विशाल मोरे, श्रीकांत राऊत सर, ग्रामपंचायत सदस्य फुले मेंबर व अनिल गायकवाड, सागर किशोर गायकवाड ,स्वागत गायकवाड,आदेश गायकवाड, लखन गायकवाड ,संदेश गायकवाड, सचिन गायकवाड, सोजल गायकवाड, ऋषी गायकवाड ,गणेश गायकवाड ,शैलेश साबळे,आदर्श गायकवाड,विश्वास भोसले ,संजय ताकतोडे, महेश शिंदे, शैलेश दिवटे,सागर काटे,ओंकार सावंत, निलेश शिंदे, यश लोंढे, अमोल भोसले, अजय कांबळे, जय खरे ,विक्रम धाईंजे,जॉन सर, राहुल सर, विखे खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी केंद्रप्रमुख प्रभाकर ननवरे व अकलूज मधील सर्व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.



