श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह 19 जागा बिनविरोध
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : सदाशिवनगर (ता.माळशिरस) येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 ते 2028-29 पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीत कारखान्याचे चेअरमन आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह 19 उमेदवार बिनविरोध झाले असून उर्वरित दोन जागांवरील उमेदवारांनी माघार घेतल्यास या कारखान्याची निवडणुक बिनविरोध होणार आहे.
सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु असून 21 संचालक निवडीसाठी एकुण 40 उमेदवारांचे 42 अर्ज दाखल झाले होते.
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीत माळशिरस उत्पादक गटातुन मिलिंद कुलकर्णी, सुरेश पाटील, महादेव शिंदे, भानुदास सालगुडे पाटील, गोपाळ गोरे, इस्लामपूर उत्पादक गटातून बाळासाहेब माने, दत्तात्रय रणवरे, कुमार पाटील, लालासो रणनवरे, भिमराव दुधाळ, शिवाजी पवार, उत्तम बाबर, आप्पा माळी, नातेपुते उत्पादक गटातून मालोजीराव देशमुख, सुधाकर पोळ, प्रफुल्ल कुलकर्णी, आनंदा मुळीक, सुभाष सुळ, फोंडशिरस उत्पादक गटातून सदाशिव वाघमोडे पाटील, शिवाजी गोरे, रामहरी गोडसे, मधुकर वाघमोङे, रणजितसिंह मोहिते पाटील, रणजीत पाटील, नारायण वाघमोडे, बोरगाव उत्पादक गटातून दत्तात्रय मिसाळ, सचिन लोकरे, बलभीम पाटील, उत्पादक सहकारी संस्था व बिगर उत्पादक सहकारी संस्था, पणन संस्था प्रतिनिधी गटातून आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचे दोन अर्ज, मधुकर वाघमोडे, अर्जुनसिंह मोहिते पाटील, अनुसूचित जाती किंवा जमाती प्रतिनिधी गटातून अर्जुन धाईंजे, महिला राखीव प्रतिनिधीमध्ये लीलावती देवकर, लीलावती खराडे, निलम सालगुडे पाटील, नागरबाई पालवे, यमुनाबाई निंबाळकर, इतर मागासवर्गीय जाती प्रतिनिधी गटातून रामदास कर्णे, शरद फुले तर भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी गटातून सुनील माने, नारायण वाघमोडे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते.
निवडणुक निर्णय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी अर्जाची छाननी केली. त्यामध्ये सालगुडे पाटील भानुदास ज्ञानेश्वर, रणनवरे लालासो देवराव, माळी आप्पा गोविंद, मुळीक आनंदा नारायण, सुळ सुभाष नाना, वाघमोडे मधुकर भानुदास, गोडसे रामहरी राजाराम, वाघमोडे नारायण सायबु, महिला राखीव प्रतिनीधी सालगुडे पाटील निलम भानुदास, पालवे नागरबाई जयवंत, इतर मागासवर्गीय जातीचा प्रतिनिधी फुले शरद भगवान, भटक्या विमुक्त जाती व जमाती. विशेष मागास प्रवर्गचा प्रतिनिधी गटातुन वाघमोडे नारायण सायबु या 12 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले होते. यापैकी काही विरोधी उमेदवारांनी या निकाला विरुध्द जिल्हा सहकार निवडणुक निर्णय अधिकारी साठे यांच्याकडे अपिल केले होते. परंतु दि 12 फेब्रूवारी रोजी त्यांनी अपिल फेटाळल्याने आता 21 जागांसाठी केवळ 23 अर्ज राहिले आहेत.
या कारखान्यास आर्थिक अडचणीतून बाहेर काढीत आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सर्वस्व पणाला लावीत कारखाना सुरु करुन कारखान्याचे सभासद व कामगार यांच्या आर्थिक प्रगतीला पाठबळ दिले होते. कारखाना सुरु झाल्याने तालुक्याच्या पश्चिम भागाच्या आर्थिक विकासाला गती प्राप्त झाली.
आता आ.मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची निवडणुक लागली आहे. कारखान्याचे हित लक्षात घेता विरोधी गटाचे उमेदवार मधुकर पाटील यांनी आ.मोहिते पाटील यांच्या विरोधात दाखल केलेला आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे . आता विरोधी गटातर्फे माळशिरस गटातुन गोपाळ गोरे व इस्लामपूर गटातुन उत्तम बाबर यांचेच उमेदवारी अर्ज बाकी राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतीम तारीख 14 फेब्रूवारी असून हे दोन उमेदवार आपला उमेदवारी अर्ज माघारी घेवून कारखान्याच्या हिताला प्राधान्य देणार की कारखान्यावर निवडणुक लादणार याकडे सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे. अनंत अडचणीतून प्रगतीकडे वाटचाल करणा-या श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणुक बिनविरोध व्हावी अशी सभासदांची इच्छा असून याबाबत दि.14 फेब्रूवारी रोजी अंतीम निर्णय होइल.