आ.रणजितसिंहानी पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या 30 गावांच्या मार्गावरील नागरिकांच्या जाणून घेतल्या समस्या ; तातडीने काम सुरू होण्यासाठी पाठपुरावा करण्याचे दिले आश्वासन

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या 30 गावांच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केलेल्या मार्गावरील गावकऱ्यांनी काल शिवरत्न बंगल्यावर रणजितसिंह मोहिते पाटील यांची भेट घेऊन आभार व्यक्त करत मनमोकळा संवाद साधला. यावेळी या मार्गाबाबतीत येणाऱ्या समस्यांवर चर्चा झाली.
गेल्या आठवड्यात आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेल्या पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या 30 गावांच्या विकासाला गती मिळण्यासाठी हायब्रीड अॅन्युईटी फेज 2 अंतर्गत खेडभोसे, देवडे पट कुरोली, आव्हे, नांदोरे, पेहे, बादलकोट, पडस्थळ, सांगवी ते उंबरे पागे, करोडे, कान्हापुरी ते प्रजिमा 131 ला मिळणार्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन दिले होते. त्यावर फडणवीस यांनी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या.
यासंदर्भातील माहिती सदरील 30 गावातील नागरिकांपर्यंत पोहचल्यानंतर त्यांनी आज आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांची शिवरत्न बांगला येथे भेट घेऊन आभार मानले. तसेच याविषयावर विस्तृत चर्चा करून काहींनी सल्ले दिले तर काहींनी समस्या मांडल्या. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दोन्ही मार्गावरील गावांतील लोकांची बैठक झाली यावेळी सर्वांना मोकळेपणाने आपले म्हणणे मांडण्यास सांगून त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन तसेच या कामाचा वैयक्तिकरित्या लक्ष घालून पाठपुरावा करत असल्याचेही आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पंढरपुर तालुक्यातील राज्य मार्ग २१६ – खेडभोसे – देवडेपट – कुरोली – आव्हे – नांदोरे – पेहे – बागलकोट – पडस्थळ – सांगवी – उमरे – करोळे – कान्हापुरी ते प्रजिमा १३१ रस्ता तसेच करमाळा तालुक्यातील ‘रोपळे – केम – वडशिवणे – कंदर – कन्हेरगाव’ रस्ता या नदीकाठच्या भागातील केळी, द्राक्ष, ऊस, दूध व शेतकरी उत्पादीत इतर मालाला वाहतुकीसाठी सदर रस्त्यांची अत्यंत गरज आहे. या रस्त्याच्या परिसरातील ऊसाची आसपासच्या 7 साखर कारखान्याला वाहतुक केली जाते. सदर रस्त्याच्या हायब्रीड अॅन्युईटी फेज 2 मध्ये समाविष्ट होण्यासाठी डीपीआर बनवण्यासाठी आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली असून सदर विनंतीला मान देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.