Latest News

उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या पुढाकारातून अकलूज येथे सलोखा चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात 

अकलूज : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे प्रेरणेतुन व अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या पुढाकारातून माळशिरस तालुक्यात प्रशासकिय विभाग व इतर कार्यक्षेत्रातील कार्यरत असणारे नागरीक याच्यांत एकजुटीचे दर्शन घडविणारे “सलोखा चषक” २०२५  क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सदरच्या क्रिकेट स्पर्धा दिनांक २५/०१/२०२५ व दिनांक २६/०१/२०२५ रोजी विजयसिंह मोहिते पाटील किडा संकुल, अकलुज येथे सकाळी ०८.०० वा ते सायकांळी ०६.०० वा या वेळेत खेळण्यात येणार आहेत.

“सलोखा चषक” २०२५ पर्व ०१ ले मध्ये प्रशासकिय विभागातुन १) तहसिल कार्यालय, माळशिरस, २) सार्वजनिक बांधकाम विभाग माळशिरस, ३) पोलीस विभाग, माळशिरस, ४) महावितरण विभाग, माळशिस, ५) नगर परिषद, अकलुज, ६) पंचायत समिती, माळशिरस, ७) जलसंपदा विभाग, माळशिरस, ८) पोलीस पाटील, माळशिरस, ९) जिल्हा परिषद शिक्षक संघ, माळशिरस हे संघ सामिल होणार आहेत. इतर कार्यक्षेत्रातील कार्यरत असणारे नागरीक यातुन १) डॉक्टर-११, २) पत्रकार संघ, अकलुज ३) ४० प्लस वयोगट, माळशिस ४) आक्रमक ११ फोटो अॅन्ड ग्रॉफिक्स टीम, ५) वकील संघटना, माळशिरस, ६) फार्मसी टीम, अकलुज, ७) लॅब स्टाफ, अकलुज, ८) शिक्षण प्रसारक मंडळ, अकलुज, ९) एम.आर. टीम अकलुज हे संघ सहभागी होणार असुन प्रशासकिय विभाग विरूध्द इतर कार्यक्षेत्रातील कार्यरत असणारे नागरीक याच्यांत क्रिकेट सामने रंगणार असुन बाद पध्दतीने सामने खेळवले जाणार आहेत. Toss winner live या युट्‌यूब चॅनेल वर सर्व सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहेत.

सहभागी होणा-या प्रत्येक खेळाडूंना वनपरिक्षेत्र अधिकारी, माळशिरस यांच्याकडून देशी जातीचे फळझाडे देण्यात येणार आहेत. त्यातुन निसर्गाचे संर्वधन करणे हा मुख्य उददेश असणार आहे. त्याच बरोबर प्रत्येक सामन्यातील चांगल्या खेळाडुंना सामनावीर चषक २०२५ ची ट्रॉफी देण्यात येणार असुन विजेत्या व उपविजेत्या संघास आकर्षक “सलोखा चषक – २०२५ ची ट्रॉफी देण्यात येणार आहे.

सलोखा चषक सामने करीता मैदान नगरपरिषद, अकलुज यांनी उपलब्ध करून दिले असुन प्रशासनातील सर्व विभागाने या स्पर्धेकरीता सहकार्य केले आहे. माळशिरस क्रिकेट असोसिएशन यांचे सहकार्य लाभले आहे.

“सलोखा चषक” – २०२५ चे उद्घाटन २५/०१/२०२५ रोजी सकाळी ०८.०० वा होणार असुन मा. विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग, अकलुज तसेच प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी हजर राहणार असुन नागरिकांनी, खेळाडूंनी, युवकांनी या स्पर्धेच्या खेळाचा आनंद घेण्याकरीता उपस्थित रहावे असे अवाहन आयोजक नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज उपविभाग अकलुज यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!