शहर

मराठा सेवा संघाच्यावतीने सन्मान नुतन आमदार उत्तमराव जानकर यांचा सन्मान

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : 254 माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या उत्तमराव जानकर यांचा मराठा सेवा संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. मराठा सेवा संघ तालुका शाखा माळशिरस यांचेवतीने उत्तमराव माने शेंडगे यांनी शिवधर्मगाथा, अभंगशतक ही पुस्तके व शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी इंजि.अशोकराव रणनवरे, माळशिरस तालुका पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र पवार, संभाजी ब्रिगेडचे माजी तालुका अध्यक्ष हनुमंतराव साळुंखे, ड़ॉ.अमोल माने- शेंडगे, अजित माने शेंडगे, बाळासाहेब पराडे-पाटील, दिलीप सांगडे, शिवाजीराव लोंढे, अजित वीर पाटील, भारत सांगडे, खंडाळीचे बाळासाहेब पवार, माळेवाडी अकलूजचे माजी सरपंच अरूण खंडागळे, भारत आगलावे,अनिल गोरख भोसले, दिलीप शिवाजी कदम, वल्लभ सांगडे यांच्यासह मराठा सेवा संघ व इतर कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सत्कार प्रसंगी मराठा सेवा संघ तालुक्यात सर्व जाती धर्माचे लोकांना एकत्रीत घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबित असल्याबाबत नवनिर्वाचित आमदार यांनी कौतुक केले व येथून पुढे मराठा सेवा संघ व 32 कक्ष सर्व समाज बांधवांना एकत्रीत घेऊन जे जे सामाजिक उपक्रम राबवतिल त्यास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन नुतन आमदार उत्तमराव जानकर यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!