सा. सातारा सम्राट कार्यालयात संविधान दिन साजरा ; साप्ताहिक महर्षीचे सहसंपादक संजय खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
महर्षि डिजीटल न्यूज
फलटण : लोकशाहीचा चौथा स्तंभ हा संविधानाच्या आधारे लोकांच्या व्येता हा पत्रकारितेच्या माध्यमातून खर्या अर्थाने मांडत असतो संविधानामुळे पत्रकारांना लिहायचा अधिकार आहे. याच अनुषंगाने सातारा सम्राट कार्यालय फलटण जि.सातारा येथे संविधान दिनाच्या निमित्ताने येथील साप्ताहिक सातारा सम्राट कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून साप्ताहिक महर्षीचे सहसंपादक संजय खरात उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांना संविधानाच्या प्रती भेट देऊन संविधानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी संजय खरात यांनी भारतीय संविधानाच्या मूल्यांवर भाष्य केले. त्यांनी लोकशाही, बंधुता, समता आणि न्याय या तत्त्वांचे पालन करून समाज घडविण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या निमित्ताने संविधान दिनानिमित्त जनजागृतीचे कार्य प्रभावीपणे करण्यात आले.
यावेळी लोकाध्यास चे संपादक राजकुमार काकडे , लहू धाईंजे, दयानंद बनसोडे, जगताप, रामभाऊ पाटोळे, यांना साप्ताहिक सातारा सम्राट चे संपादक गोविंद मोरे यांनी संविधान प्रत देऊन पत्रकार तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सातारा सम्राट कार्यालयाच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.