Latest News

अकलूज पोलिसांची मोठी कारवाई ; पिकअप वाहनासह तब्बल 23 लाख 86 हजारांचा गुटखा पकडला

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात 

अकलूज : विमल आणि आर एम डी पण मसाल्याच्या तब्बल 50 बॅगा व चार मोठ्या बॉक्सची वाहतूक करणाऱ्या पिकप वाहनाला पकडण्यात अकलूज पोलिसांना यश आले असून वाहनाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा कंपणीचे पिकअप वाहन नं एम एच ४५ ए एफ २३०७ हे वाहन प्रतिबंधीत गुटखा वाहतुक करताना मिळुन आल्याने सदरचे वाहन तपासुन पहाता सदर वाहनातील पोत्यांमध्ये प्रतिबंधीत गुटखा मिळुन आला. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापुर यांना कळवुन त्याचे उपस्थितीमध्ये सदर वाहनातील गुटखा माल तपासुन पाहण्यात आला. 

 त्यामध्ये विमल पान मसाला ४५ खाकी रंगाच्या बॅगा त्यामध्ये ९३६० पाऊच तसेच त्याचा व्हि वन तंबाखु ९३६० पाऊच, विमल पान मसाला मोठा ०५ खाकी बॅगा त्यामध्ये ११०० पाऊच तसेच त्याचा व्हि वन तंबाखु ११०० पाऊच व आर एम डी पान मसाला ०४ मोठे बॉक्स त्यामध्ये १६० पुडे तसेच मिश्रण करणारा एम सेंटेड तंबाखु १६० पुडे असा गुटखा तसेच महिंद्रा पिकअप वाहनासह एकुण २३,८६,०००/-रू किमतीचा माल मिळुन आला आहे. 

सदर महिंद्रा कंपणीचे पिकअप वाहन नं एम एच ४५ ए एफ २३०७ या वाहनाचा चालक सुनिल बळी चंदनशिवे वय ४३ वर्षे रा. एकतपुर रोड, लिंगे वस्ती शेजारी सांगोला जि. सोलापुर यांचेविरूध्द श्री. मंगेश मल्हारी लवटे वय ३७ वर्षे धंदा सरकारी नोकरी सहायक आयुक्त यांचे कार्यालय अन्न व औषध प्रशासन म. राज्य सोलापुर यांचे फिर्याद दिल्याने आरोपी विरूध्द अकलुज पोलीस ठाणेस गु.र.नं. ७२७/२०२४ अन्न सुरक्षा व मानके कायदयातील शिक्षापात्र कलम २६ (२) (i), २६(२) (ii), २६(२) (iv), २७ (३) (९), ३० (२) (a), ५९, नियमन ३,१,७ व सहवाचन नियम २,३,४ व बी.एन.एस कलम २२३,२७४,२७५, व १२३ प्रमाणे सविस्तर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोहेकॉ बकाल, पोहेकॉ पठाण हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!