लाडकी बहीण योजने मध्ये माळशिरस तालुक्यातून 121077 अर्जांना मंजुरी ; बाळासाहेब सरगर यांची माहिती
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये माळशिरस तालुक्यातून प्राप्त झालेल्या अर्जापैकी एकूण 121077 अर्जांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती योजनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी दिली.
अकलूज येथे प्रांत अधिकारी कार्यालयात प्रांत अधिकारी विजया पांगारकर व योजनेचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या प्रमुख उपस्थितीत लाडकी बहीण योजनेस संदर्भात बैठक संपन्न झाली यावेळी बाळासाहेब सरगर यांनी माळशिरस तालुक्यातील एकही बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही असे आश्वासन दिले.
यावेळी माळशिरस तालुक्यामधून आत्तापर्यंत नारीशक्ती ॲप 69294 व नवीन पोर्टलवरून 53760 असे एकूण 123054 अर्ज प्राप्त झाले त्यापैकी नारीशक्ती ॲप 68638 व नवीन पोर्टल 52439 असे एकूण 121077 अर्जांना मंजुरी देऊन पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे तर नॉन आधार सीडी पैकी नारीशक्ती ॲप6631 व पोर्टल8278 असे एकूण14909 आधार शेडिंग नसल्याने पेंडिंग आहे याबाबत अंगणवाडी सेविका यांना गाव जाऊन लाभार्थीपर्यंत पोहोचण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही बाळासाहेब सरगर यांनी सांगितले.
तसेच गावांमध्ये ग्रामसेवक व तलाठी यांना गावामध्ये दवंडी देऊन लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा सुद्धा सूचना देण्यात आल्या असून याबाबत कॅम्प घेऊन आचारसंहितेपूर्वी एकही लाभार्थी याच्या पासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात आले आहे माळशिरस तालुक्यातून 43 लाभार्थींची पैसे बँकेत कट झाले आहे याबाबत बँकांची बैठक घेण्याबाबत येणार आहे शिवाय १३४४ अर्ज जन्मतारखेत बदल आधार कार्ड मध्ये व बँक खात्यामधील चुका यामुळे रिजेक्ट झाले त्याच्या सुद्धा याद्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याकडे देण्यात येणार आहेत माळशिरस तालुक्याच्या सर्वांनी केलेले प्रयत्न मुळे सोलापूर जिल्ह्यात तालुक्याचा लाभार्थ्यांमध्ये अग्रेसर आहे यामध्ये सोलापूर या ठिकाणी आठ तारखेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांच्या समवेत होणाऱ्या महिला व मेळावा बाबत जास्तीत जास्त महिला कार्यक्रमासाठी घेऊन बाबत विचारविनिमय करण्यात आला त्यांची व्यवस्था पार्किंग व्यवस्था याबाबत प्रांत मॅडम यांनी सविस्तर सर्वांना सूचना करण्यात आले आहेत.
बैठकीसाठी सीडीपीओ आतार मॅडम नातेपुतेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, अकलूजचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, तालुका सदस्य सतीश सपकाळ, महाळुंग नगरपंचायतीचे प्रतिनिधी, पंचायत समितीच्या वावरे मॅडम आदी उपस्थित होते.



