कीर्तीध्वजसिंह मोहिते पाटील व शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामुदायिक विवाह सोहळा थाटात संपन्न ; दहा जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : शिवरत्न उद्योग समूहाचे चेअरमन कीर्तीध्वजसिंह मोहिते पाटील व सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीपुर येथे भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे आयोजन युवा उद्योजक बजरंग रमेश भोसले यांनी केले होते.
सोहळ्यात दहा जोडप्यांनी विवाहबंधनात अडकत नवजीवनाची सुरुवात केली. हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून, हजारो नागरिकांनी या मंगलमय क्षणाला साक्षीदार म्हणून उपस्थिती लावली.
प्रमुख पाहुणे म्हणून देवन्या शिवतेजसिंह मोहिते पाटील, रामचंद्र सावंत पाटील, प्रकाशराव पाटील, सुनीता पाटील, डाके साहेब, कास्टे साहेब, मस्के साहेब, चव्हाण साहेब व अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने वधू-वरांना संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. तसेच, आयोजक बाजरंग भोसले यांनी गरजू व गरीब कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा संकल्प व्यक्त केला.
शिव-कीर्ती युवा मंचाच्या वतीने आयोजित या मंगलमय सोहळ्यामुळे परिसरात सामाजिक एकता व सहकार्याचा संदेश देण्यात आला. श्री गणेश हॉल, श्रीपूर येथे झालेल्या या सोहळ्याची परिसरात मोठी चर्चा आहे.
यावेळी लक्ष्मी चव्हाण, भिमराव रेडे पाटील, नानासाहेब मुंडफणे, राहुल रेडे पाटील, अनिल जाधव, अनिल मुंडफणेअ, रुण तोडकर, राजेंद्र वाळेकर, सोमनाथ मुंडफणे, तानाजी भगत, नाझिया पठाण, मदन भगत, प्रतापराव पाटील, मदन पाटील, विजय भोसले, राजू भोसले, विजय गुंड पाटील, अमोल जोरवर, प्रशांत पाटील, दत्तात्रय भिलारे, हिम्मतराव पाटील, विराज निंबाळकर, योगेश माने शेंडगे, नरेंद्र भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.
सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी होण्यासाठी सागर यादव, बबलू भगत, राजनंदन नाईकनवरे, बबन कदम, संजय सुरवसे, संदिप लांडगे, रमेश देवकर, तनवीर तांबोळी, विपीन सुर्यवंशी, अक्षय जाधव, करण जाधव, छोटू मुलाणी, अदि परकाळे, ज्ञानेश्वर कांबळे, सतिष पवार, निखील उयडे, अनिल सरवदे, किशोर पिसे, नागा भोसले, रेहान मुलाणी, नामदेव वादव, सचिन रेडे, धनंजय कुरडे, शुभम साठे आदींनी विशेष परिश्रम घेतले.