उद्या शिवरत्न वर वादळ… धैर्यशील मोहिते पाटील यांची कार्यकर्त्यांना साद ; तुमच्या सहमतीने निर्णय घेवुया…

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : तुम्ही या… आम्हाला बोलायचं आहे… त्यासाठीच भेटु अशी साद घालत धैर्यशील मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. त्यामुळे उद्या रविवार दि. १४/०४/२०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता. शिवरत्न बंगल्यावर कार्यकर्त्यांचे वादळ येणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
अनेक दिवसांचा सस्पेन्स आता अखेरच्या टप्प्यावर आला असून भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांचे भेट घेतल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील व मोहिते पाटील परिवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश निश्चित असला तरी तत्पूर्वी ते कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठीच त्यांनी कार्यकर्त्यांना साद घातली असून शिवरत्न वर येण्याचे आवाहन केले आहे.



